नागपूर - संजय राऊत सरकारच्या योजनांविषयी वेड्यांचा बाजार असे बोलले असले तरी त्यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाढी वाल्या(शिंदे) डॉक्टरला दाखवावे लागेल, दररोज ते काहीतरी विचित्र बोलतात, नवा विषय चर्चेसाठी देण्याचे काम ते करतात, फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही असा टोला शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी लगावला. धनंजय मुंडे संदर्भात अंजली दमानिया यांनी काय आरोप केले मला माहित नाही असा सावध पवित्रा घेतला.
पालकमंत्री - संपर्कमंत्री बाबत बोलताना ते म्हणाले, लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पक्षाला तालुका जिल्हा पातळीवर पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. शेवटी आमचे उत्तरदायित्व जनतेशी आहे. जनतेचे प्रश्न सुटत असेल तर , दावा असणे सोडणे हा विषय नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हा निर्णय घेतील, ते सर्व मान्य करतील.
छगन भुजबळ यांनी कुठे जावे, लोकशाहीत तो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे, कोणाला प्रवेश द्यावा हा त्या पक्षाचा अधिकार आहे. शिक्षण विभागातील घोटाळे निदर्शनास आले तर चौकशी करू,असे सांगितले. स्कूल बस भाडेवाढ बाबत संबंधितांशी चर्चा करू, अंशतः अनुदान बाकी असून यात शासन निर्णय झाला आहे, निधी उपलब्ध होऊ शकला नाही, बजेटमध्ये मागणी करू, नवीन नियुक्ती बाबत ज्यांची परीक्षा झाली, त्यांना नियुक्त करु असे भुसे म्हणाले.