बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. वाल्मिक कराडचे व्हिडीओ का पाहातो? म्हणत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशोक मोहिते असं मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. अशोक मोहिते या तरुणाला बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकराणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांनी मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केलं आहे, मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कृष्णा आंधळेचं स्टेटस
आज कृष्णा आंधळे याचा वाढदिवस आहे. आंधळेच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी आपल्या व्हॉट्अॅपला कृष्णा आंधळेचा फोटो स्टेटस ठेवला होता. वैजनाथ बांगर, अभिषेक सानप नावाच्या कृष्णा आंधळेच्या मित्रांनी स्टेटसला त्याचा फोटो ठेवला होता. याच दरम्यान वाल्मिक कराडचे व्हिडीओ पाहात असलेल्या अशोक मोहिते या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे.