नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अॅडव्हांटेज विदर्भ २०२५ - खासदार औद्योगिक महोत्सव’ उद्घाटन ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
विदर्भाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे औद्योगिक सामंजस्य करार या तीन दिवसात होणार आहेत. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) द्वारे आयोजित या महोत्सवाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर, अंबाझरी मार्ग येथे उद्घाटन होईल.7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव आयोजित
करण्यात आला आहे. महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. सोबतच प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदाल, बालसुब्रह्मण्यम प्रभाकरन, रोशनी नादर मल्होत्रा यांच्यासह अनेक मंत्री, नेते उपस्थित राहतील.
320 स्टॉल्स, डॉली चहावाला आकर्षण
या औद्योगिक प्रदर्शनात विविध उत्पादने आणि बहु-क्षेत्रीय उद्योगांचे 320 हून अधिक स्टॉल राहणार आहेत. स्टॉलमध्ये संरक्षण सार्वजनिक उपक्रम, स्टील आणि खाण मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, सेबी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, जीएसटी विभाग, पोस्ट विभाग, इत्यादिंचे स्टॉल असणार आहेत आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त डॉली चायवाला यांची उपस्थिती प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र असेल.
या कार्यक्रमात स्टील, संरक्षण, विमान वाहतूक, बांबू, दुग्धव्यवसाय, शिक्षण, आयटी आणि आयटीईएस, लॉजिस्टिक्स, स्टार्टअप्स, फार्मास्युटिकल्स, अक्षय ऊर्जा, पर्यटन, वस्त्रोद्योग, रत्ने आणि दागिने, स्टार्टअप इकोसिस्टम एंगेजमेंट यासह विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय चर्चासत्रे आणि तांत्रिक चर्चा आयोजित केल्या जातील. स्टार्टअप क्षेत्रातील युनिकॉर्न संस्थापक अखिल गुप्ता, संस्थापक, नो ब्रोकर डॉट कॉम विभव कपूर, सह-संस्थापक, प्रिस्टाईन पॉलिसीबाजारचे अध्यक्ष आणि सीईओ सर्ववीर सिंग आणि अपनाचे निर्मित यांचा सहभाग राहील. तसेच, युनिकॉर्न व्हेंचर्सचे अनिल जोशी, गुगल स्ट्रॅटअपचे अपूर्व चामरिया, हेलिकॉप्टर मॅन प्रदीप शिवाजी मोहिते, एअर व्हाइस मार्शल सूर्यकांत चाफेकर, लेफ्टनंट जनरल संजय वर्मा, मेजर जनरल अनिल बाम, एआयसीटीई दिल्लीचे डॉ. अभय जेरे, टीसीएसचे अरविन कुमार, नौकरी डॉट कॉमचे रोहित दमानी हे देखील विविध सत्रांमध्ये सहभागी होतील.
अॅडव्हान्टेज विदर्भमध्ये पहिल्यांदाच पेटंट गॅलरी प्रदर्शित केली जात आहे. यात पर्यावरण/सामाजिक प्रभाव, कोअर इंडस्ट्री, केमिकल, अशा एकूण 41 पेटंटचा समावेश राहणार आहे. याशिवाय विविध फूड कोर्ट, मनोरंजनासाठी गेमिंग आणि ई-गेमिंग झोन, फॅशन शो, बँड स्पर्धा यांनाही एक्स्पोमध्ये स्थान देण्यात आले आहे. भारत मोबिलिटी येथे लाँच केलेली दुचाकी आणि चारचाकी ई-वाहने देखील प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहेत.
९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या समारोप समारंभाला केंद्रीय वाणिज्य मंत्री माननीय पीयूष गोयल, मुख्य संरक्षक नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, संजय राठोड, अॅड. आशिष जयस्वाल, पंकज भोयर आणि इंद्रनील नाईक यांची उपस्थित राहणार आहेत.
आयोजन समितीचे अध्यक्ष अजय संचेती आणि अॅडव्हांटेज विदर्भची टीम, असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे, सचिव डॉ. विजय कुमार शर्मा, उपाध्यक्ष गिरधारी मंत्री आणि प्रणव शर्मा, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी आणि कार्यकारी समितीने उद्योजक, व्यावसायिक, उद्योगातील भागधारक, विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.