हिंगोली (Rojgar Melava) : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर हिंगोली व तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सेनगाव येथे “पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या (Rojgar Melava) मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक या पात्रतेच्या 254 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 141 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या (Rojgar Melava) रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकीत कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्राचार्य बोथीकर यांनी स्वत:ची क्षमता ओळखून ती सिध्द करावी, असा मंत्र उमेदवारांना दिला. उमेदवारांनी स्वत:चे गाव सोडून मिळेल तिथे नोकरी मिळवावी, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. पी. रांगणे यांनी याप्रसंगी सांगितले.
सहायक आयुक्त डॉ. रा.प्र.कोल्हे यांनी रोजगार मेळाव्याचा हेतू विशद करताना म्हणाले, मेळाव्याच्या माध्यमातून उद्योजक आपल्या दारी येत आहेत. त्यामुळे युवकांनी मेळाव्यामध्ये सहभाग घेऊन संधीचे सोने करावे. तसेच उमेदवारांना स्वत: रोजगार (Rojgar Melava) निर्मिती करणारे बनावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. तळणीकर यांनी रोजगार मेळावे हे युवकांसाठी चालून आलेली संधी आहे, उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महाराष्ट्र इंटरनॅशनल मध्ये भरतीबाबची माहिती वाय. पी. टोनपे यांनी दिली.
या (Rojgar Melava) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. टी. यु. केंद्रे यांनी केले तर व्ही. बी. कल्याणकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे कर्मचारी तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली या कार्यालयाचे वाय. पी. टोनपे, म. शां. लोखंडे, रा.द.कदम, म. ना. राऊत, ना. ज. निरदुडे, र. ला. जाधव, अमोल आडे यांनी परिश्रम घेतले.