नंदुरबारमध्ये गुईलेन बॅरे सिंड्रोमचा (GBS) उद्रेक पाहायला मिळत आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ने दिलेल्या वृत्तानुसार, येथे जीबीएसचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. हे दोन्ही रुग्ण अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात या बालकांवर उपचार सुरू आहे. यातील एका बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजत आहे. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच दुसऱ्या बालकाची प्रकृती स्थिर असून त्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, नंदुरबारमध्येही जीबीएसचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच शासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून 20 बेड्चे आयसीयू तयार करण्यात आलं आहे.