वसतिगृहात राहणारा शाळकरी मुलगा कॅनाॅलच्या पाण्यात गेला वाहून ; नायगावात खळबळpudhari photo
Published on
:
05 Feb 2025, 4:01 pm
Updated on
:
05 Feb 2025, 4:01 pm
नायगाव : अर्धवट शाळा करून कॅनाॅलच्या आलेल्या पाण्यात पोहण्याचा बेताने गेलेल्या पाच पैकी एक मुलगा वाहून गेल्याची घटना नायगाव शहरात घडली असून,घटनेची माहिती मिळताच वसतिगृह गृहपाल,अन्य कर्मचारी यांनी शोध घेऊन पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी शोधून देखील तो सापडला नसल्याने पालक, व वसतिगृह चालकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नायगाव येथील शासकीय वसतिगृह येथे राहून जनता हायस्कूल येथे इयता आठवी वर्गात शिकणारी पाच मुलं बुधवारी अर्धवट शाळा करून शाळेतून पळून गेले .नंतर ते जनता हायस्कूल व शासकीय वसतिगृह या मध्ये येणाऱ्या नांदेड हैद्राबाद महा मार्गावरील कॅनाॅलमध्ये पोहण्यासाठी गेले. पाच मुला पैकी रितेश मारूती सुर्यवंशी हा काठोकाठ भरलेल्या कॅनाॅलमध्ये बुडताना पाहून इतर चार जण आदित्य कागडे,रजप्रिय कगडे,विशाल गायकवाड, व भारत वाघमारे हे आठवीच्या वर्गात शिकणारे घाबरून पळून गेले.
वसतिगृह गृहपाल येथून एक कि.मी अंतरावर असलेल्या वस्ती गृहात गेले. गृहपाल यांनी या मुलांची कसून चौकशी केली असता रितेश वाहून गेल्याचे सांगितले. गृहपाल शेबटवाड, व वसतिगृह कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सापडून न आल्याने नायगाव पोलिसात तक्रार केली व बलेगाव तालुका उमरी येथील रहिवासी पालक मारोती सुर्यवंशी यांना व ज्येष्ठ अधिकारी मिंनगिकर यांना घटनेची माहिती फोनवरुन दिली व बोलवून घेतले.
नायगाव बिटचे पोलीस जमादार साईनाथ सांगवीकर,वरिष्ठ अधिकारी मिंनगिकर यांच्या मार्गदर्शनात एक टीम रात्री उशिरा पर्यंत शोध घेत होती. या घटनेने खळबळ उडाली असून वसतिगृह येथे वचक पूर्ण शिक्षण देत नसल्याने भीती नसलेली मुलं शाळेला न जाता मोकाट फिरत असल्याची चर्चा आहे. यातूनच हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.