Published on
:
05 Feb 2025, 2:25 pm
Updated on
:
05 Feb 2025, 2:25 pm
खादगाव : पाचोड परिसरात काही तरूणांनी हातात शस्त्रे घेवून रील बनवत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. यातून त्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पाचोड पोलिसांनी मंगळवारी दुपारी त्यांना ताब्यात घेत त्यांची पाचोड बस स्थानकापासून पोलीस स्टेशन पर्यंत धिंड काढली.
या घटनेची माहिती मंगळवारी दुपारी पाचोड पोलिसांना मिळताच पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी या घटनेची दखल घेत तातडीने आरोपी विनोद राजकर, कृष्णा राजकर, विजय राऊत , विशाल शेळके, आदिल वाघ, नचिकेत पालवे, अंबादास वाघ, करण शेळके या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची पाचोड बस स्थानकापासून पाचोड पोलीस स्टेशन पर्यंत धिंड काढली. पाचोड पोलीस स्टेशन मध्ये मंगळवारी दुपारी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पाटील करत आहे.
पाचोड परिसरामध्ये जर असं कोणी सोशल मीडिया वरती रील काढून दहशत पसरवत असेल तर त्याची माहिती तातडीने पाचोड पोलीस स्टेशनला द्यावी माहिती देणाऱ्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. पाचोड व परिसरात अशी कुठलीही दहशत खपवून घेतली जाणार नाही.
शरदचंद्र रोडगे पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पाचोड पोलीस स्टेशन तालुका पैठण