आ. पवारांच्या भूमिकेमुळे दुणावला औसेकरांचा उत्साह
औसा (Latur Train) : लातूर ते गुलबर्गा रेल्वे जाईल तर औसा येथूनच जाईल! हा प्रश्न घेऊन माजी आमदार बसवराज पाटील यांच्यासह आपण रेल्वेमंत्र्यांना भेटणार आहोत, असा शब्द औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांनी दिला. यामुळे गेल्या काही वर्षांपूर्वी लातूर-गुलबर्गा या प्रस्तावित रेल्वे मार्गाचा ‘बदललेला मार्ग’ पुन्हा सरळ रेषेतून (Latur Train) लातूरहून थेट औसा मार्गे जाण्याची आशा निर्माण झाली आहे. आमदार पवारांच्या या ठाम भूमिकेमुळे औसेकरांचा उत्साह दुणावला आहे.
लातूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका कर्तबगार लोकप्रतिनिधीचा वीरशैव समाजाच्यावतीने जाहीर सत्कार असा येथे करण्यात आला. हा सत्कार खरे तर औसा विधानसभेच्या आमदाराचाच नव्हे, तर लातूर जिल्ह्याच्या नवनेतृत्वाचा सत्कार होता. (Latur Train) लातूर जिल्ह्याच्या भाजपाचे नेतृत्व आता अभिमन्यू पवार यांच्याकडे आल्याचे गेल्या महिनाभरातील झालेल्या कार्यक्रमावरून लक्षात येत आहे. शिवाय आमदार अभिमन्यू पवार यांची दुसरी टर्म अगदी ‘शडो सीएम’, अशी सुरू झाली असेल पवारांची देहबोली आता बिनधास्त दिसत आहे.
औशाच्या विकासात मैलाचा दगड ठरलेल्या आ. अभिमन्यू पवार यांनी आता अर्चनाताई पाटील चाकूरकर व बसवराज पाटील मुरूमकर यांच्या साथीने लातूर जिल्ह्यात आपला सवता सुभा मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय आमदार अभिमन्यू पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेली पोत पाहता या नेतृत्वाकडून आपल्या व आपल्या समाजाच्या पदरात काहीतरी पडेल, याची खात्री झाल्यानेच चाकूरकर व मुरूमकर यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी यापुढे ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. गेली अनेक वर्ष काँग्रेसचा विचार ठामपणे सांगणाऱ्या या दोन्ही घराण्यांनी आता ‘सबका साथ सबका विकास’, हा विचार अंगिकारल्याने आगामी काळात या समाजासाठी आमदार पवार किती योगदान देतात, याची उत्सुकता संपूर्ण (Latur Train) लातूर जिल्ह्याला लागली आहे.
आमदार असताना बसवराज पाटील यांनी (Latur Train) लातूर गुलबर्गा रेल्वे मार्गासाठी सर्वप्रथम तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठपुरावा केला. या मार्गासाठी सुरुवातीच्या काळात रेल्वे मंत्रालयाने तरतूदही केली होती मात्र नंतर सरकार बदलले आणि भाजपच्या गेल्या पाच वर्षाच्या काळात लातूर गुलबर्गा हा नैसर्गिक मार्ग सोडून प्रस्तावित रेल्वे मार्ग भलत्यात दिशेने भरकटत गेला. तो इतका भरकटला की त्याबाबत इतर नेत्यांनी बोलणेही सोडून दिले. मात्र भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर बसवराज पाटील यांनी त्याच ताकदीने पुन्हा मूळ प्रश्न हाती घेतला. गेल्या टर्ममध्ये आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर गुलबर्गा रेल्वे मार्गाबाबत थोडीशी नरमाईची भूमिका घेतली होती; मात्र या (Latur Train) टर्ममध्ये त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून आता औसेकर या विषयावर आमदार पवारांच्या पाठीशी आपली संपूर्ण ताकद उभी करतील, यात कोणालाही शंका घेण्याचे कारण नाही.
औशाच्या विकासाची सुटलेली ‘वंदे भारत एक्सप्रेस’!
औसा येथे गेल्या चार दिवसांपूर्वी आमदार अभिमन्यू पवार यांचा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपाने त्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या उपस्थितीत वीरशैव समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या (Latur Train) कार्यक्रमात समाजाच्या कार्यकर्त्यांना आगामी काळात काही पदांवर संधी द्याव्यात अशी भूमिका अर्चनाताईंनी मांडली. त्याला आमदार पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. औसा विधानसभा मतदार संघातील गतिमान विकासाने प्रभावित झालेल्या औसा येथील वीरशैव समाजाने आमदार अभिमन्यू पवारांचा केलेला हा सत्कार म्हणजे औशाच्या विकासाची सुटलेली ‘वंदे भारत एक्सप्रेस’ म्हणावी लागेल.