त्वचा चमकदार आणि हेल्दी राहण्यासाठी अनेकजण बाजारात मिळणारे महागडे ब्युटी प्रॉडक्टचा वापर करतात. परंतु कालांतराने या प्रॉडक्टचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतो. त्यामुळे अनेकजण चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळावी यासाठी घरगुती उपाय करत असतात. त्याचबरोबर केवळ महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर केल्याने त्वचेचे सौंदर्य वाढत नाही, तर आतून निरोगी राहणंही गरजेचं आहे. जर तुम्हाला हेल्दी आणि चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्हाला सकाळची सुरुवात हेल्दी ड्रिंकने करणे महत्वाचे आहे. बरेच लोकं ग्रीन टी पिणे पसंत करतात, काहीजण कोमट पाण्यात मध मिसळतात, तर काही लोकं हळदीचे पाणी आरोग्य आणि त्वचेसाठी सर्वोत्तम मानतात.
पण प्रश्न असा आहे की, सकाळी कोणते पेय पिणे सर्वात फायदेशीर आहे? कोणते पेय तुमच्या त्वचेला आतून पोषण देऊ शकतात आणि नैसर्गिकरित्या चमकदार बनवू शकतात ? आज या लेखात आपण याविषयी जाणून घेणार आहोत.
1. ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, पॉलीफेनॉल आणि कॅटेचिन समृद्ध असतात, जे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. ग्रीन टी केवळ तुमची त्वचा आतून साफ करत नाही तर पिंपल्स आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या सुद्धा कमी करण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी एक कप ग्रीन टी प्या. यात तुम्ही मध आणि लिंबाचा रस मिसळून त्याची चव तर वाढवलाच आणि फायदे देखील वाढवता येतात जे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी अत्यंत लाभदायक असेल.
२. हनी वॉटर
आपल्या सर्वांनाच माहित आहे की, मध हा आयुर्वेदात सर्वात फायदेशीर नैसर्गिक उपाय मानला जातो. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्यास त्वचेला आतून पोषण मिळते आणि त्वचा मऊ आणि हायड्रेटेड राहते. मधाचे पाणी त्वचेला हायड्रेटेड ठेवते, नैसर्गिक चमक देते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि कोरडी त्वचा नैसर्गिकरित्या मऊ बनवते. तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मध मिसळू सकाळी रिकाम्या पोटी प्या आणि चांगल्या फायद्यासाठी तुम्ही लिंबाचा रस मिक्स करू शकता.
३. हळदीचे पाणी
हळदीमध्ये आढळणारे कर्क्युमिन एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी एजंट असतात जे तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हळदीचे पाणी शरीराला आतून स्वच्छ करते आणि त्वचेला नैसर्गिक चमक देते. तसेच हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरुम कमी होतात. व त्वचेचा टोन चांगला होतो. याव्यतिरिक्त, हे त्वचेचे जळजळ होण्यापासून संरक्षण करते. एक ग्लास कोमट पाण्यात १/४ चमचा हळद पावडर मिसळा. सकाळी रिकाम्या पोटी प्या. हे घरगुती उपाय तुमच्या त्वचेला चमकदार आणि हेल्दी ठेवतात.
कोणता पर्याय सर्वोत्तम आहे?
जर तुम्हाला अँटी-एजिंग आणि डिटॉक्सिफिकेशनवर लक्ष केंद्रित करायचे असेल तर ग्रीन टी हा सर्वोत्तम पर्याय आहे. दुसरीकडे, जर तुमची त्वचा कोरडी असेल आणि तुम्ही ती हायड्रेट आणि मऊ करू इच्छित असाल तर मधाचे पाणी सर्वोत्तम आहे. त्यातच तुम्हाला त्वचेवर डाग, पिंपल्स किंवा जळजळ कमी करायचे असेल तर हळदीचे पाणी सर्वात फायदेशीर ठरेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)