दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. दिल्लीतील सर्व 70 जागांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवाडीनुसार, सर्वाधिक मतदान ईशान्य दिल्ली जिल्ह्यात म्हणजेच 63.83 टक्के झाले, तर सर्वात कमी मतदान दक्षिण पूर्व दिल्ली जिल्ह्यात म्हणजेच 53.77 टक्के झालं आहे.
दरम्यान, मतदारांबद्दल बोलायचे झाले तर, दिल्लीत 1.56 कोटी मतदार आहेत. त्यापैकी ८३.७६ लाख पुरुष, 72.36 लाख महिला आणि 1,267 तृतीयपंथी मतदार आहेत. निवडणूक आयोगाने यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यातच 7,553 पात्र मतदारांपैकी 6,980 जणांनी आधीच मतदान केले आहे.
Voting concludes in Delhi Assembly elections
All voters in queue after formal closing hours of polling at 6 PM are allowed to cast their vote, as per Election Commission of India. pic.twitter.com/DbnIQElfSS
— ANI (@ANI) February 5, 2025