छगन भुजबळPudhari News Network
Published on
:
05 Feb 2025, 10:36 am
Updated on
:
05 Feb 2025, 10:36 am
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत (SASCI) केंद्र शासनाकडून नाशिक कुंभमेळा 2026-2027 साठी भांडवली गुंतवणूक प्रकल्प प्रस्तावित करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पत्राद्वारे केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-2025 च्या अर्थसंकल्पात राज्यांसाठी केंद्राच्या 'भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य' योजनेसाठी ₹ 1.5 लाख कोटींची तरतूद केली आहे. भांडवली गुंतवणुकीसाठी केंद्राची राज्यांना विशेष सहाय्य योजना भांडवली खर्चाला चालना देण्यासाठी राज्य सरकारांना 50 वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज देते.
भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून नाशिक कुंभमेळा २०२६-२७ साठी भांडवली गुंतवणूक प्रकल्प प्रस्तावित करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण पत्राद्वारे केली आहे.
भांडवली खर्चाचे अनेक पटीत होणारे परिणाम लक्षात घेऊन… pic.twitter.com/WYm6BkRnhy
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 5, 2025भांडवली खर्चाचे अनेक पटीत होणारे परिणाम लक्षात घेऊन आणि राज्यांद्वारे केल्या जाणाऱ्या भांडवली खर्चाला चालना देण्यासाठी, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-2025 मध्ये 'भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य 2024-2025 ही योजना जाहीर करण्यात आली आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्यांना भांडवली गुंतवणूक प्रकल्पांसाठी 50 वर्षांच्या बिनव्याजी कर्जाच्या स्वरुपात आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येत आहे.
राज्य शासनाने 'भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना 2024-2025 अंतर्गत नाशिक कुंभमेळा 2026-2027 साठी भांडवली गुंतवणूक प्रकल्प केंद्रीय अर्थमंत्रालय भारत सरकार यांना प्रस्तावित करण्याची गरज असून याअंतर्गत केंद्र शासनाकडून नाशिक कुंभमेळा 2026-2027 साठी भांडवली गुंतवणूक प्रकल्प केंद्रीय अर्थ मंत्रालय भारत सरकार यांना प्रस्तावित करण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास आगामी कुंभमेळ्यासाठी आणि नाशिकच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.