परभणी/पाथरी(Parbhani) :- गौणखनिजाची अवैधरित्या वाहतुक (Illegal transportation) करताना महसुल प्रशासनाकडून जप्त करण्यात आलेली वाहने संबंधीत मालकांनी सोडवून घेण्यासाठी प्रशासनाडून शेवटची संधी देण्यात आली आहे . यावेळी वाहने सोडवून न घेतल्यास वाहनांचा लिलाव करत दंड वसूल करण्यात येणार आहे.
११ फेब्रुवारी रोजी पर्यंत वाहन मालकांना दंडाची रक्कम भरण्याची शेवटची संधी
पाथरी तहसील कार्यालय अंतर्गत अवैध गौण खनिज वाहतूक करत असतांना आढळून आलेल्या वाहनावरती करण्यात आलेल्या दंडात्मक कार्यवाही अंतर्गत सर्व जप्त वाहनांचा लिलाव करण्यासंदर्भात सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांनी वाहनांचा मुल्यांकन कार्यालयास सादर केले आहे. ११ फेब्रुवारी रोजी पर्यंत वाहन मालकांना दंडाची रक्कम शासनखाती भरून वाहन कार्यमुक्त करण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली आहे . या तारखेपूर्वी दंड न भरल्यास वाहन लिलाव करून दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल .