७ डिसेंबर पासुन योगेशचा तुटला होता संपर्क
लोकप्रतिनिधींस भारतीय दूतावासाने पाठपुरावा केल्यामुळे योगेश पांचाळ हा सुखरूप रित्या आला घरी
वसमत (Yogesh Panchal) : येथील अभियंता योगेश पांचाळ हा इराण मध्ये बेपत्ता झाला होता इराण येथे नोकरीसाठी गेला होता तिथून बेपत्ता झाला दोन महिने बेपत्ता असलेला योगेश सुखरूप मायदेशी परतला आहे. योगेश (Yogesh Panchal) सुखरूप परत आल्याने कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. आमदार राजू पाटील नवघरे यांनी पांचाळच्या सुटकेसाठी शासकीय स्तरावर सर्वांनी मोठे प्रयत्न केले होते.
वसमत येथील अभियंता योगेश पांचाळ (Yogesh Panchal) हा तीन महिन्यापूर्वी तेहरान (इराण) येथे गेलेला होता. तेहराण मधील एका नामांकित हॉटेलवर थांबलेला असताना त्यांचा कुटुंबीयांशी त्याचा संपर्क बंद झाला. कुटुंबाने त्यांच्याशी फोनवरून अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होत नसल्याने कुटुंब चिंतातूर झाले होते. कुटुंबाने भारतीय दुतावासाला माहिती दिली त्यानंतर त्याच्या तपासाची चक्र फिरणे सुरू झाली दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी त्याचा काही पत्ता लागत नसल्याने पंचाळ (Yogesh Panchal) कुटुंब चिंतेत होते. त्यांनी वसमतचे आमदार राजू पाटील नवघरे यांच्याशी संपर्क साधला आमदार राजू पाटील नवघरे यांनी हा विषय लावून धरला आणि विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. तसेच शासनाच्या भारतीय दूतावासाने तेहराण दूतावासाशी संपर्क साधून माहिती घेण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर योगेशच्या तपासाला गांभीर्याने सुरुवात झाली.
केंद्र सरकारने तेहरानच्या दुतावासासोबत संपर्क साधला असताना योगेशला तेथील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली. योगेश पांचाळची आई भाऊ पत्नी मित्रपरिवार यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली मिळेल त्या नेत्यासोबत संपर्क साधाला व्यथा मांडल्या योगेशला परत आणावें अशी विनवणी केली. पत्नी श्रद्धा पांचाळ ,भाऊ मंगेश पांचाळ, सचिन जोशी यांनी वारंवार (Yogesh Panchal) योगेश पांचाळ याच्या सुटकेसाठी आमदार खासदार दुतावास आणि राज्य सरकार केंद्र सरकार पर्यंत पाठपुरावा सुरू ठेवला होता अखेर योगेश सुखरूप असल्याची माहिती मिळाली मिळाल्याने सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता मंगळवारी योगेशला विमानाद्वारे मुंबईला पाठवण्यात आले मुंबई येथील विमानतळावर कुटुंबाला बोलावण्यात आले होते पांचाळ कुटुंबीय मित्रपरिवार यांनी मुंबईच्या विमानतळावर योगेश पांचाळ यांचे जंगी स्वागत केले.
दोन महिने बेपत्ता असलेल्या योगेशला (Yogesh Panchal) पाहून योगेशच्या कुटुंबीयांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले तीन महिन्याच्या कालावधीत कुटुंबाला प्रचंड त्रास झाला या कठीण प्रसंगात आमदार राजू पाटील नवघरे व सर्वांनी सहकार्य केले असल्याच्या भावना यावेळी कुटुंबीयांनी व्यक्त केल्या.