अमरावती (Lord Venkatesh Balaji) : स्थानीक जयस्तंभ चाैक येथील श्री व्यंकटेश बालाजी भगवान मंदिरात आज गुरुवारपासून (ता.६) मंगळवार 11 तारखेपर्यत ब्रम्हाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. साेमवारी 19 तारखेला भव्य रथयात्रा काढण्यात येणार आहे.
अनंतकाेटी ब्रम्हांडनायक (Lord Venkatesh Balaji) श्री व्यंकटेश बालाजी भगवान यांचा ब्रम्हाेत्सव आज गुरुवार (ता. ६) पासून सुरु हाेत आहे. गुरुवारी सकाळी पाच ते 11.30 या वेळेत सुप्रभातम्, मंगला आरती, नित्य आराधना, वेदपाठ, यज्ञ (हवन), आरती गाेष्टीप्रसाद, दुपारी साडेचार ते रात्री दहा या वेळेत अंकुरराेपण, श्री विश्वकसेन आराधना, ब्रम्हाेत्सव प्रारंभ, गरूड प्रतिष्ठा, आरती, पुष्पमाला धारण, वेदपाठ, नित्य आराधना, अर्चना, गाेष्टीप्रसाद व शयन आरती हाेणार आहे.
शुक्रवार सकाळी पाच ते दुपारी साडे अकरा या वेळेत सुप्रभातम्, मंगला आरती, नित्य आराधना, वेदपाठ, अग्निप्रतिष्ठा, यज्ञ (हवन), पालखी, ध्वजाराेहण, अभिषेक, आरती, गाेष्टीप्रसाद, दुपारी चार ते सायंकाळी दहा या वेळेत यज्ञ (हवन), पूजा, नित्य आराधना, वेदपाठ, आरती, पालखी,देवता आव्हान, भेरी पूजन, अर्चना, गाेष्टीप्रसाद, शयन आरती, शनिवार 8 तारखेला सकाळी पाच ते दुपारी साडे अकरा या (Lord Venkatesh Balaji) वेळेत सुप्रभातम मंगला आरती, नित्य आराधना, वेदपाठ, यज्ञ (हवन), पालखी, मूलविग्रह, उत्सवमूर्ती 108 कलश अभिषेक, दुपारी 4.15 ते रात्री दहा या वेळेत यज्ञ (हवन), वेदपाठ, नित्य आराधना, पालखी, वेदपाठ, आरती, अर्चना, आरती, गाेष्टीप्रसाद, शयन आरती हाेणार आहे.
रविवारी सकाळी पाच ते दुपारी साडे अकरा या वेळेत सुप्रभातम, मंगल आरती, नित्य आराधना, वेदपाठ, यज्ञ (हवन), पालखी, श्री रामानुज स्वामीजी अभिषेक, आरती, गाेष्टीप्रसाद, दुपारी साडेचार ते रात्री दहा या वेळेत यज्ञ (हवन), पूजा, नित्य आराधना, कल्याण उत्सव, वेदपाठ, पालखी, अर्चना, गाेष्टीप्रसाद, शयन आरती हाेणार आहे. साेमवार 10 तारखेला सकाळी पाच ते दुपारी बारा या वेळेत सुप्रभातम मंगला आरती, नित्य आराधना, यज्ञ (हवन), वेदपाठ, पालखी, अभिषेक, आरती गाेष्टीप्रसाद, रथप्रतिष्ठा पूजन, सायंकाळी साडे चार वाजता यज्ञ (हवन), वेदपाठ, सायंकाळी सात वाजता रथपूजन, रथयात्रा, नगर भ्रमण, मंदिरातून निघणार आहे. रात्री रथयात्रा मंदिरात पाेहाेचल्यानंतर शयन आरती हाेणार आहे.
मंगळवारी 11 तारखेला सकाळी पाच ते दुपारी साडेबारा या वेळेत (Lord Venkatesh Balaji) सुप्रभातम मंगला आरती, नित्य आराधना, वेदपाठ, यज्ञ (हवन), महापूर्णाहूती, अवभ्रुस्नान, (चक्रस्नान), आरती गाेष्टीप्रसाद, दुपारी साडेचार ते सायंकाळी सात या वेळेत वेदपाठ, नित्य आराधन, सायंकाळी सात वाजता द्वादश आराधन, पुष्पयाग, पालखी, ध्वजअवराेहण, नित्य आराधना, आचार्य सन्मान, आरती गाेष्टीप्रसाद, रात्री दहा वाजता शयन आरती व गाेष्टीप्रसाद हाेणार आहे. अमरावतीकर भाविकांनी सर्व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर ट्रस्टींनी केले आहे.
साेमवारी निघणार रथयात्रा
अनंतकाेटी ब्रम्हांडनायक श्री व्यंकटेश बालाजी भगवान (Lord Venkatesh Balaji) यांची यथयात्रा साेमवार 10 तारखेला सायंकाळी सात वाजता निघणार आहे. सायंकाळी सात वाजता रथपूजन झाल्यानंतर रथयात्रा निघणार आहे. जयस्तंभ चाैक येथील मंदिर परिसरातून रथयात्रा खत्री कंपाऊंड, प्रिया टाॅकीज, जयस्तंभ चाैक, सराेज चाैक, बापट चाैक, प्रभात टाॅकीज मार्ग, साबनपुरा पाेलीस चाैकी, धनराज लेन, सक्करसाथ, जवाहर गेट, चित्रा चाैक, जुना काॅटन मार्केट राेड ते श्री व्यंकटेश बालाजी मंदिर येथे पाेहाेचणार आहे.