विषारी द्रव प्राशन करुन झाडाला घेतला गळफास…!
परभणीच्या बोरी येथील घटना
परभणी/बोरी (Farmer termination Case) : सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून एका शेतकर्याने विषारी द्रव प्राशन करत झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवार ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० च्या सुमारास घडली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, (Farmer termination Case) बोरी पोलिस ठाण्यात वसंत किशनराव कंठाळे यांनी खबर दिली आहे. त्यांचे चुलते सुरेश मदाजी कंठाळे (वय ५६ वर्ष, रा. नामदेव नगर, बोरी) यांनी सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून बुधवारी दुपारी विषारी द्रव प्राशन केले. तसेच शेतातील झाडाला गळफास घेतला. सुरेश कंठाळे यांच्यावर खाजगी व सरकारी बँकेचे मिळून १२ लाखाचे कर्ज होते. त्यांना तीन एकर शेती आहे.
सदर प्रकरणात (Farmer termination Case) बोरी पोलिसात नोंद घेण्यात आली आहे. घटनास्थळी सपोनि. सुनिल गोपीनवार, पोलिस अंमलदार पांडूरंग तुपसुंदर यांनी भेट देत पंचनामा केला. तपास पोउपनि. सचिन सोनवणे करत आहेत. मयत शेतकर्या च्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.