मानोरा (Police raid) : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या हद्दीतील पोहरादेवी बिट मधील उमरी बु येथे ग्राम पंचायत निवडणुक संदर्भात दि. ५ फेब्रुवारी रोजी पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून आरोपी अनिता भिमराव इंगोले वय ५० वर्ष हिचे राहते घरात झडती घेतली असता ४२ हजाराची मुद्देमाल (Police raid) गावठी दारू पकडून पोलीसांनी कारवाई केली.
यामध्ये १०० – १०० लीटर सडवा मोहा माचने भरलेले तीन ड्रम एकुण ३०० लीटर सडवा कि ३०००० रूपये व एका ड्रम मध्ये ७९ लीटर गावठी हात भट्टी दारु कि ७००० रूपये , दारु गाळण्याचे ईतर साहित्य ५००० रूपये असा एकुण ४२००० रू चा प्रो माल अवैद्यरित्या मिळुन आल्याने आरोपी वर कलम ६५ ई फ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई (Police raid) पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे याचे मार्गदर्शनाखाली डि बी पथक पोहवा मदन पुणेवार, पोहेड कॉन्स्टेबल प्रेमसिंग चव्हाण, पोलीस शिपाई मनिष अगलदरे यांनी केली.