रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरीला जात असतात त्यामुळे रेल्वे पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी ट्रेनच्या एसी कोचमध्ये मळके कपडे घातलेला एक प्रवासी दिसला. जीआरपी पोलीसांनी त्याच्याकडे रोखून पाहीले तर तो मोबाईलमध्ये पाहाण्याची नाटक करु लागला. जीआरपी पोलिसांनी त्यांच्या हालचाली पाहून संशय आला, त्यामुळे जीआरपी पोलिसांना त्याला त्याचे नाव विचारले. त्यानंतर तो घामाघुम झाला.अडखळत त्याने आपले नाव सांगितले. जीआरपीचा संशय आणखीनच बळावला आणि त्यानंतर त्यांची झडती घेतली तेव्हा सत्य समोर आले….
जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव साहिल उर्फ साहीब असे निघाले असून तो एक मोबाईल चोर असून नैनितालचा रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.साहिल एसी कोचमधून प्रवास करताना प्रवाशांचे महागड मोबाईल आणि किंमती वस्तू चोरुन पसार व्हायचा. पोलिसांना दोन हवा होता.त्याच्यावर मोबाईल चोरीचे दोन गुन्हे दाखल होते. शाहजहांपुर जीआरपी ठाण्याच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
हे सुद्धा वाचा
बाराबंकीमध्ये पकडला गेला मोबाइल चोर
याच प्रकारे बाराबंकी रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीचे नाव असलम हुसैन असून तो आसाममधील होजाई जिल्ह्यातील पव कदुलिमारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आहे. चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना जीआरपी पोलिसांची नजर त्याच्यावर पडली. तो जीआरपी पोलिसांना पाहून पळू लागला. त्यानंतर जवानाने धावत जाऊन त्याला पकडले.त्याची झडती घेतली असता त्याच्या चोरलेला मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे.