Latur :- मराठी माणसाच्या हृदयातील अनमोल ठेवा, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji maharaj) यांच्या जयंती निमित्त पानगावात मराठवाडास्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्या संघासाठी तब्बल १ लाख ५० हजार रुपयांची रोख स्वरुपात पारितोषिके ठेवण्यात आल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीच्यावतीने देण्यात आली.
17 फेब्रुवारीपासून स्पर्धांना सुरुवात; दीड लाखांची बक्षिसे पानगाव
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने पहिल्याच वर्षी या मराठवाडा स्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे (dance competition) आयोजन करण्यात आले असून येथील महात्मा गांधी चौकामध्ये या स्पर्धेची सुरुवात १७ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या मोठ्या गटासाठी खुलागट प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये ठेवण्यात आले आहे. तर द्वितीय पारितोषिक ३१ हजार रूपये तर त्रतीय पारितोषिक २१ हजार रुपये ठेवण्यात आले आहेत तर समूह नृत्य लहान गटासाठी प्रथम पारितोषिक २१ हजाराचे, द्वितीय पारितोषिक १५ हजार रुपये तर तिसरे पारितोषिक ११ हजार रुपये ठेवण्यात आले आहेत.
या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघानी सहभाग नोंदवावा. असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.