बीड जिल्ह्यातील आष्टी उपसा सिंचन क्रमांक ३ शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन कामाची पाहणी, बोगदा कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी जाहीर भाषणादरम्यान सुरेश धस एकदा मागे लागले की डोकं खाऊन टाकतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढे त्यांनी बीड जिल्ह्यातील दुष्काळावर भाष्य केले. ते म्हणाले, मराठवाडा जर दुष्काळमुक्त करायचा असेल […]
बीड जिल्ह्यातील आष्टी उपसा सिंचन क्रमांक ३ शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन कामाची पाहणी, बोगदा कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी जाहीर भाषणादरम्यान सुरेश धस एकदा मागे लागले की डोकं खाऊन टाकतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढे त्यांनी बीड जिल्ह्यातील दुष्काळावर भाष्य केले. ते म्हणाले, मराठवाडा जर दुष्काळमुक्त करायचा असेल तर वाहून जाणारं ५३ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आलं पाहिजे. ते जर आलं तर मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला. पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाड्याचा दुष्काळ भुतकाळ होईल. आपण मागेच जीआर काढला. पण सरकार गेलं, त्यामुळे काम झालं नाही. पुन्हा शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार आलं. जलसंपदा खातं माझ्याकडे आलं. त्यावेळी चार नदीजोड प्रकल्प तयार केले. त्याचा पाठपुरावा सुरू केला. सर्व अडचणी दूर केल्या. सर्व्हेक्षणाचे टेंडर काढले. आता हे काम पूर्णपणे मार्गी लागली आहे. मूळ संकल्पना बाळासाहेब विखे पाटलांनी मांडली. त्यांचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच काम दिलं आहे. वर्ष भरात हे नदीजोड प्रकल्पाचं काम आपण सुरू करू. आणि ५३ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणू. त्यामुळे मराठवाडा दुष्काळमुक्त होईल’, असं फडणवीस म्हणाले.
नाशिक आणि नगर विरुद्ध उरलेला मराठवाडा असा संघर्ष पाहायला मिळतो. जायकवाडीतून पाणी देतो म्हटलं तर इथून सुखरुप निघेल. पण संभाजीनगरला सुखरुप राहील का. नदीजोड प्रकल्पानंतर जायकवाडीत भरपूर पाणी येणार आहे. तेव्हा तुम्हाला पाणी द्यायला कोणी नकार देणार नाही. काही झालं तरी मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही. मोदींना आम्ही विनंती केली. आपण आंतरराज्य नदीजोड प्रकल्पांना पैसे देता. आम्हाला चारही प्रकल्प राज्यांतर्गत करायचे आहे. त्याला मान्यता द्या. मोदी म्हणाले, तुम्ही आमच्याकडे पाठवा. आम्ही त्यालाही मान्यता देऊ, असा विश्वासही फडणवीसांनी दिला.
Published on: Feb 05, 2025 04:16 PM