पश्चिम बंगाल (Vijay Durg) : विंग कमांडर तिवारी म्हणाले की, फोर्ट विल्यममधील किचनर हाऊसचे नाव बदलून माणेकशॉ हाऊस करण्यात आले आहे, तर दक्षिण गेट, ज्याला पूर्वी सेंट जॉर्ज गेट म्हंटले जात होते, ते आता शिवाजी गेट (Shivaji Gate) म्हणून ओळखले जाईल.
कोलकाता येथील लष्कराच्या पूर्व कमांड मुख्यालय ‘फोर्ट विल्यम’ (Fort William) चे नाव बदलून ‘विजय दुर्ग’ असे करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence), कोलकाता येथील मुख्य जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर हिमांशू तिवारी यांनी याची पुष्टी केली. ते म्हणाले की, फोर्ट विल्यममधील काही इतर ऐतिहासिक वास्तूंची नावे देखील बदलण्यात आली आहेत.
या ठिकाणांची नावे बदलली…
विंग कमांडर तिवारी म्हणाले की, (Fort William) फोर्ट विल्यममधील किचनर हाऊसचे नाव बदलून माणेकशॉ हाऊस (Manekshaw House) करण्यात आले आहे, तर दक्षिण गेट, ज्याला पूर्वी सेंट जॉर्ज गेट म्हटले जात होते, ते आता शिवाजी गेट म्हणून ओळखले जाईल.
त्याचे नाव विजय दुर्ग का ठेवले गेले?
विजय दुर्ग हा एक अतिशय मजबूत किल्ला होता, जो जिंकणे जवळजवळ अशक्य होते. म्हणून विजय दुर्ग (Vijay Durg) हे नवीन नाव म्हणून निवडण्यात आले आहे. हे नाव भारतीय सैन्याच्या ताकदीचे आणि धाडसाचे प्रतिबिंब आहे. हा बदल देशाच्या इतिहासातील एका नवीन अध्यायाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे.
फोर्ट विल्यमचा इतिहास काय आहे?
ईस्टर्न कमांडच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, सध्याचा फोर्ट विल्यम सुमारे 177 एकरमध्ये पसरलेला आहे. 1757 मध्ये सिराज-उद-दौलाच्या सैन्याने नष्ट केलेल्या मूळ किल्ल्याची जागा हे घेते. ब्रिटीश राजवटीने (British Rule) 1758 मध्ये या नवीन किल्ल्याचे बांधकाम सुरू केले आणि त्याचा पहिला टप्पा 1781 मध्ये पूर्ण झाला.
ते म्हणाले की, जुन्या किल्ल्याच्या (Fort William) पराभवापासून धडा घेत, इंग्रजांनी अधिक सुरक्षा उपायांसह एक नवीन किल्ला बांधला. त्याची रचना अष्टकोनी आकारात करण्यात आली होती. ज्यामध्ये आठ दरवाजे होते आणि त्याभोवती खंदक होते. यातील तीन दरवाजे हुगळी नदीकडे तोंड करून होते तर इतर दरवाजे मोकळ्या मैदानाकडे तोंड करून होते. त्यावेळी ते ग्लेसिस (Glacis) म्हणून ओळखले जात असे आणि आज ते कोलकाता मैदान म्हणून ओळखले जाते. ते पुढे म्हणाले की किल्ल्याच्या भिंतींवर 497 तोफा तैनात होत्या, परंतु किल्ल्यावर कधीही हल्ला झाला नसल्याने कोणत्याही शत्रूवर त्या डागण्याची गरज पडली नाही.