अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला उघड धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की मी माझ्या सहकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे जर इराणने माझी हत्या केली तर त्याला ( इराण ) बर्बाद केले जाईल. इराणवर अधिकाधिक निर्बंध लादण्याच्या कागदपत्रांवर सह्या करण्याच्या दरम्यान ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की,’ जर त्याने ( इराण ) असे केले ( माझी हत्या ) तर त्याला तबाह केले जाईल.’ ते म्हणाले की मी निर्देश दिले आहेत की जर ते असे करतील तर त्यांना नष्ट केले जाईल,त्यानंतर काहीच शिल्लक राहणार नाही.’
इराणने रचला होता कट
अमेरिकेच्या न्याय विभागाने नोव्हेंबरमध्ये आरोप केले होते की राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीपूर्वी इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा कट रचला होता, ज्यास नाकाम केले होते. इराणी अधिकाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये फरहाद शकेरी ( ५१) नावाच्या व्यक्तीला ट्रम्प यांच्यावर नजर ठेवणे आणि त्यांची हत्या करण्याचे आदेश दिले होते असे अमेरिकन न्याय विभागाने म्हटले होते. शकेरी आता देखील इराणमध्ये आहे.
ट्रम्प यांची इराणच्या विरोधात कठोर पावले
इराणवर दबाव वाढविण्यासाठी अमेरिकेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यकारी अध्यादेशावर सही केली आहे. या आदेशाबरहकूम अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाला निर्देश दिले आहेत की त्यांना इराणवर कठोर प्रतिबंध लावावेत..यात विशेष करुन त्यांच्या तेल निर्यातीला लक्ष्य करण्याचा आदेश देण्यात आले आहेत. ट्रम्प यांच्या मते इराण आण्विक हत्यार बनविण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे. त्यामुळे त्याच्यावर निर्बंध लादणे गरजेचे आहे.
हे सुद्धा वाचा
इराणने दिली आहे धमकी
इराणने २०२३ रोजील डोनाल्ड ट्रम्पना मारण्याची धमकी दिली होती. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड एअरोस्पेश फोर्सचे हेड आमिर अली हाजीजादेह यांनी म्हटले होते की अल्लाच्या मनात असेल तर आम्ही ट्रम्प यांना जरूर मारु.आम्ही त्या सर्व मिलिटरी कमांडरना मारू इच्छीतो जे इराणचे सैन्य कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येत सामील होते. ३ जानेवारी २०२० रोजी सुलेमानी याची हत्या करण्यात आली होती.