परभणी (Parbhani):- ग्लोबल वॉर्मिंगचा (Global warming) परिणाम जाणवू लागला आहे. सन २०२४ हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. तापमान वाढीचा परिणाम २०२५ मध्येही जाणवत आहे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे चटके बसू लागले आहे. सरासरी कमाल तापमान ४ अंशाने वाढले आहे.
दुपारच्यावेळी तीव्रता अधिक फेब्रुवारीत उन्हाचे चटके ?
फेब्रुवारी महिन्यात ४ तारखेला सरासरी कमाल तापमान ३१.८ अंश सेल्सिअस इतके असते. मात्र सध्या हे तापमान ३५.५ अंश सेल्सिअस एवढे आहे. किमान तापमानातही (Temperature) वाढ झाली आहे. या दिवसात सरासरी किमान तापमान १२.४ अंशसेल्सिअस इतके असते सद्यस्थितीत १४.२ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिक जाणत आहे.