एफडी गुंतवणूक आणि कर बचतीसाठी चांगला पर्याय आहे. यामध्ये आयकर अधिनियमनुसार 80C नुसार 1.5 लाखपर्यंत सुट मिळते. पाच वर्षांच्या लॉक इन कालावधीत पैसे काढता येत नाही.
आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा एक खास पर्याय सांगणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का की, SBI कडून काही खास FD ही चालवल्या जात आहेत. यात SBI च्या 400 दिवसांच्या FD चा समावेश आहे. ही FD SBI अमृत कलश FD स्कीम म्हणून ओळखली जाते. आज आम्ही तुम्हाला अमृत कलश FD स्कीम, याविषयी पुढे विस्ताराने माहिती देणार आहोत.
जेव्हा जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ येते तेव्हा बहुतेक लोक पैशांची FD करण्याचा विचार करतात. कारण FD मध्ये पैसे गुंतवून पैसे गमावण्याची भीती नसते. यासोबतच FD मध्ये मिळणारा परतावाही निश्चित असतो. हेच कारण आहे की बहुतेक गुंतवणूकदार FD मध्येच पैसे गुंतवतात.
FD मधील गुंतवणुकीचा व्याजदर बँकांनुसार वेगवेगळा असतो. अशावेळी तुम्ही तुमचे पैसे सर्वाधिक व्याजदर असलेल्या FD मध्ये गुंतवावेत. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI बद्दल बोलायचे झाले तर SBI आपल्या ग्राहकांना FD मध्ये खूप चांगला व्याज दर देते. SBI मधील FD चे व्याजदर चला जाणून घेऊया.
हे सुद्धा वाचा
SBI FD व्याजदर
SBI मध्ये वेगवेगळ्या कालावधीतील FD चे व्याजदर 3.50 टक्क्यांपासून 7.25 टक्क्यांपर्यंत आहेत. याशिवाय SBI कडून काही खास FD ही चालवल्या जात आहेत. यात SBI च्या 400 दिवसांच्या FD चा समावेश आहे. ही FD SBI अमृत कलश FD स्कीम म्हणून ओळखली जाते.
5,00,000 च्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळतो?
SBI च्या अमृत कलश FD योजनेत म्हणजेच 400 दिवसांच्या कालावधीच्या FD मध्ये 5 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास सामान्य नागरिकांना 7.10 टक्के दराने परतावा मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के दराने परतावा मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मॅच्युरिटीवर 5,40,089 रुपये मिळणार आहेत. तर, ,ज्येष्ठ नागरिकांना मुदतपूर्तीवर 5,43,003 रुपये मिळतील.
गुतवणूक करताना अनेक गोष्टी या पडताळून पाहणे गरजेचे आहे. तुम्ही कोठेही पैसे गुंतवा पण सुरक्षित आहेत की नाही, याची शाश्वती आधी करून घ्या. कारण, तुमचा कष्टाचा पैसा हा सुरक्षित राहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञ सल्ला घेणं देखील तितकंच गरजेचं आहे.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)