तो जिथे दिसेल त्याला ठेचा आणि गाडा:अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे, उदयनराजे भोसले राहुल सोलापूरकरवर संतापले
3 hours ago
2
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावर छत्रपतींचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही संताप व्यक्त केला आहे. महापुरुषांबद्दल अशी विधाने करणाऱ्या लोकांना दिसेल तिथे ठेचले पाहिजे, असे टोकाची प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली. या विकृतीची वाढ झाल्यास देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल, असेही ते म्हणाले. राहुल सोलपूरकरने तसे विधान केले तर त्याला औरंगजेबाची औलादच म्हणायला पाहिजे, असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटका करताना मुघलांना लाच दिली होती, असे विधान अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यात संतापाची लाट उसळली. राज्यभरातील शिवप्रेमींनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला. ठाकरे गटाच्या वतीने त्यांच्या घरासमोर आंदोलनही केले होते. त्यात आता उदयनराजे भोसले यांनीही संताप व्यक्त केला आहे. काय म्हणाले उदयनराजे भोसले? अशा विधानामुळे मलाच नाही, तर अनेक शिवप्रेमींना वेदना होतात. हा राहुल सोलापूरकर म्हणजे कोण आहे? तो जो म्हणाला लाच. जे लाच घेतात यांना लाचपलिकडे काही समजत नाही. अशा लोकांच्या जीभा हासडल्या गेल्या पाहिजे. महापुरुषांबद्दल अशी विधाने करणाऱ्या लोकांना दिसेल तिथे ठेचले पाहिजे. वेचून ठेचले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली. ही विकृतीची वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. वेगवेगळ्या जातीधर्मात अशा विकृतांमुळे तेढ निर्माण होते, असेही ते म्हणाले. अशा अभिनेत्यांचे सिनेमे बंद केले पाहिजेत या विकृतीची वाढ झाल्यास देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. विकृत लोकांमुळेच वेगवेगळ्या जातीधर्मात तेढ निर्माण केले जातात. राहुल सोलपूरकरांबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बोलणार आहे. महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधाने करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, त्यांच्यावर देशद्रोहाचा कायदा लागू केला पाहिजे, यासाठी मी अमित शहांची देखील भेट घेणार असल्याचे उदयनराजे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाही, तर देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही. विकृत विधाने करणाऱ्यांना थांबवले पाहिजे. त्यांचे सिनेमे बंद केले पाहिजे. निर्माते, दिग्दर्शकांनीही अशा लोकांनाही थारा देऊ नये, असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले. बेताल विधाने करणाऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजे या लोकांना गाडले पाहिजे. त्यांना गाडले नाही तर देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे. कठोर शब्दात मी निषेध करतो. त्याला गोळ्या घालून मारले पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे जे लोकं असतील त्या सर्वांना गोळ्या घातल्या पाहिजे. कुणीही बेताल विधाने करायचे. जीवाची पर्वा न करता शिवाजी महाराज पुढे गेले. अशा महापुरुषांबद्दल अशी विधाने होत असतील, तर दुसरा काही पर्याय नाही. तो जिथे दिसेल त्याला ठेचा आणि गाडा, असा संताप उदयनराजेंनी व्यक्त केला. आळा घातला नाही, तर इतिहासाला वेगळे वळण देतील आज आपण शिवाजी महाराजांची प्रतिमा देव्हाऱ्यात ठेवतो. का तर, बाकीच्यांनी साम्राज्य वाढवण्यासाठी लढाया केल्या. पण शिवाजी महाराज गोरगरीबांसाठी लढले. स्त्रीयांचे संरक्षण केले. परकीय आक्रमण थोपवले. अशा लोकांवर वेळीच आळा घातला नाही, तर आपल्या इतिहासाला वेगळे वळण देतील. कालांतराने शिवाजी महाराजांना वेगळे दाखवतील. असे ते म्हणालेत. त्याला औरंगजेबाची औलादच म्हणायला पाहिजे राहुल सोलपूरकरवर कारवाई करा. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. तुरुंगात टाका. एक दोन दिवसात अमित शाह यांची भेट घेणार. आधीही त्यांना भेटलो होतो. खासदार असो की मंत्री असो शोधून गाडले पाहिजे. ठेचले पाहिजे. ही चूक नाही तर घोडचूक आहे. औरंगजेबच्या भेटीला जाताना लाच दिली म्हणून भेटीला गेले. तसे नव्हते. त्यांच्या शौर्याचं प्रतिक होते. लाच कशाला देतील. राहुल्याची लायकी काय आहे? राहुल तसे विधान केले तर त्याला औरंगजेबाची औलादच म्हणायला पाहिजे. त्याच्यावर किती चर्चा करायची. त्याला ठेचा ना. किती वेळ लागतोय, असेही उदयनराजे म्हणाले. हे ही वाचा... छत्रपतींचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता:आक्षेपार्ह विधानानंतर राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी, व्हिडिओ शेअर करत दिले स्पष्टीकरण अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या विधानानंतर ते चांगलेच चर्चेत आले. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली होती. राहुल सोलापूरकर यांनी एक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची या विधानामागची नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली. मी महाराष्ट्रातला शिवप्रेमी नागरिक आहे महाराजांचा नखभरही अवमान करण्याचा माझा प्रयत्न नाही, असेही ते म्हणाले. पूर्ण बातमी वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)