भिक्षा झोळीत धान्याची 115 पोती, गूळ, साखर अन् गव्हाचे पीठही दान, शिर्डीत तीन दिवसांपासून चाललेल्या श्रीसाईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाची सांगता

4 days ago 3
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या वतीने ११ ऑक्‍टोबरपासून सुरू असलेल्‍या श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाची सांगता रविवारी (१३ ऑक्टोबर) काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली. दरम्यान, श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित भिक्षा झोळीत ग्रामस्‍थ व साईभक्‍तांनी भरभरुन दान दिले. त्यामध्‍ये गहू, तांदुळ ज्‍वारी व बाजरीची सुमारे ११५ पोते, गूळ, साखर व गहू आटा याद्वारे ३ लाख ६५ हजार ५३० रुपये व रोख ६१ हजार ५०१ रुपये, अशी एकूण ४ लाख २७ हजार ३१ रुपये देणगी भिक्षा झोळीद्वारे प्राप्‍त झाली. उत्सवानिमित्त रविवारी पहाटे श्रींचे मंगल स्‍नान व त्‍यानंतर ‘शिर्डी माझे पंढरपूर’ ही आरती झाली. सकाळी ७ वाजता संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्‍नी वंदना गाडीलकर यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा व गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्‍यात आली. सकाळी १० वाजता कैलास खरे (रत्‍नागिरी) यांचे काल्‍याचे कीर्तन झाले. काल्‍याच्‍या कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्‍त बायजाबाई कोते व तात्‍या पाटील कोते यांचे वंशज परिवारातील सदस्‍य राजेंद्र सुभाष कोते यांच्‍या हस्‍ते दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी मंदिर प्रमुख विष्‍णू थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त उपस्थित होते. त्‍यानंतर दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली, दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान उदय दुग्‍गल, पुणे यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम, दुपारी ३.३० ते ५.३० वाजता ललिता पांडे, जोगेश्‍वरी यांचा ‘साई स्‍वराधना’ कार्यक्रम झाला. सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, सायंकाळी ७ ते ९.३० या वेळेत सक्‍सेना बंधू, दिल्‍ली यांचा ‘साईभजन संध्‍या’ कार्यक्रम हा श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपात होणार आहे. रात्री १० वाजता श्रींची शेजारती होईल. ‘श्रीसाई दैनंदिनी’चे प्रकाशन श्री साईबाबा पुण्‍यतिथी (दसरा) उत्सवाच्या मुहुर्तावर श्री साईबाबा संस्‍थान प्रकाशित ‘श्री साई दैनंदिनी’ व दिनदर्शिकेचे प्रकाशन श्री साईबाबा संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश अंजू शेंडे-सोनटक्‍के, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्‍ते झाले. उत्‍सवासाठी तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ, प्र. उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी परिश्रम घेतले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article