मटका किंग सम्राट कोराणे याला पोलिसांनी कळंबा कारागृहातून ताब्यात घेतले. Pudhari Photo
Published on
:
07 Feb 2025, 7:41 am
Updated on
:
07 Feb 2025, 7:41 am
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत मोका कारवाई झालेल्या आणि जिल्हा कोर्टात शरण आलेला शहरातील कुख्यात मटका बुकी सम्राट सुभाष कोराने (वय 42 रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) याला आज (दि.७) सकाळी पोलिसांनी कळंबा कारागृहातून ताब्यात घेतले.
शहर पोलीस उपाधीक्षक तथा तपास अधिकारी अजित टिके यांनी सम्राट कोराने याचा ताबा मिळावा यासाठी गुरुवारी विशेष मोका न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर गुरुवारी सायंकाळी न्यायालयाने सम्राट कोराने याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा कळंबा कारागृह प्रशासनास आदेश दिला होता त्यानुसार आज सकाळी 11 वाजता पोलीस बंदोबस्तात कोराने याला पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेण्यात आले. यावेळी कारागृह परिसरात त्याचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते
तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि तत्कालीन शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी सम्राट कोराणे यांच्यासह 44 जनावर मोका अंतर्गत कारवाई केली होती सावळा आणि. कोराने वगळता 42 जणांना यापूर्वीच अटक झाली होती मात्र कोराने सहा वर्षापासून पोलिसांना चकवा देत असा राहिला होता अखेर दोन दिवसापूर्वी तो जिल्हा न्यायालयात हजर झाला आज दुपारी त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.