मतदान करताना वापरले बनावट आधारकार्ड:पुण्यातील लाखेवाडी मतदान केंद्रावरील घटना, एकास अटक
3 hours ago
1
विधानसभा निवडणुकी दरम्यान इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी मतदान केंद्र येथे एकजण बाेगस मतदान करताना रंगेहाथ पकडण्यात अाले अाहे. मतदान केंद्रावर कार्यरत असलेले निरीक्षक गणेश गाेरक्षनाथ वलजाले यांच्या सर्तकतेमुळे हा गैरप्रकार उघडकीस अाला. याप्रकरणी मुजावर माेहम्मद हनीफ पैगंबर (वय-३५) यास अटक करण्यात अालेल्या अाराेपीचे नाव अाहे. मुजावर हा वायरमन म्हणून काम करत असून ताे बावडा येथील खंडाेबानगर येथे राहत अाहे. मुजावर याने बनावट अाधारकार्डचा वापर करुन दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने मतदान करण्याचा गैरप्रकार केला. निरीक्षक गणेश वेलजाले हे भैरवनाथ विद्यालय, खुटबाव येथे सहाय्यक शिक्षक पदावर काम करत असून त्यांच्याकडे लाखेवाडी मतदान केंद्राची केंद्राध्यक्ष नियुक्ती करण्यात अाली. मुजावर हा मतदान केंद्रावर अाल्यावर त्याने स्वत:चे नाव राजेंद्र गिरमे सांगितले व मतदार क्रामंक १३१९ सांगण्यात अाले. परंतु तपासणीत संबंधित नावावर पहिलेच मतदान झाले हाेते. त्यामुळे त्यांना संशय निर्माण झाला व त्यांनी सदर व्यक्तीस त्याचे अाेळखपत्र दाखविण्यास सांगितले. त्यानुसार मुजावर याने अाधारकार्ड दाखवले. त्यावर संग्राम गिरमे असे नाव व त्याचा फाेटाे हाेता. परंतु अाधारकार्ड क्रमांकाबाबत शंका अाल्याने त्यांनी मतदान केंद्रावर तैनात पाेलीस कर्मचारी यांच्याकडे सदर व्यक्तीला साेपवले. मतदान केंद्रावरील पाेलिंग एजंट अाप्पासाे ढाेले (वय-४८) व रविंद्र पानसरे यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्यावर इंदापूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला. त्याने काेठुन बनावट अाधारकार्ड बनवले , त्याला बाेगस मतदानास काेणी पाठवले याबाबत तपास करण्यात येत अाहे. बॅलेट पेपर फाेटाे व्हायरल केल्याने गुन्हा दाखल पुरंदर विधानसभा मतदारसंघात निवडणुक नियमांचे उल्लंघन करुन मतदान केंद्रात माेबाईल घेऊन जाऊन मतदान करतेवेळी गाेपनीयता पाळण्या एेवजी उमेदवाराला मतदान करतानाचा फाेटाे काढून ताे बॅलेट पेपर फाेटाे साेशल मिडियावर व्हायरल केल्याप्रकरणी एका अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. सासवड पाेलीस ठाण्यात याबाबत एका अपक्ष उमेदवाराने तक्रार दिली अाहे. सासवड पाेलीस ठाण्याचे पथक गस्त करत असताना त्यांना निवडणुक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली. अपक्ष उमेदवार उदयकुमार जगताप यांनी यासंर्दभात तक्रार करुन सांगितले की, मतदान केंद्रावर मतदार व बूथ एजंट फाेनचा वापर करत अाहे. मतदार बॅलेट पेपरचा फाेटाे काढून त्याचा व्हिडिअाे बनवून साेशल मिडियावर व्हायरल करत अाहे. त्यानुसार याप्रकरणी भारतीय दंड संहिता धारा २२३ व १७१ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तसेच लाेकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३० चे देखील उ्लंघन करण्यात अाल्याचे सांगण्यात अाले अाहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)