मतदान केंद्रांवर बसण्यासाठी ठेवणार बेंच:लांब रांग असल्यास ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांना विश्रांती‎

2 days ago 3
मतदान केंद्रांवर मतदारांच्या मतदान संपण्याआधी लांबलचक रांगा असतात, तसेच मतदान केंद्र हे मुख्य द्वारापासून लांब असते. अशात मध्यमवयीन, नुकतेच आजारातून सावरलेले, ज्येष्ठ नागरिक यांना मतदान करणे सुविधाजनक व्हावे, यासाठी रांगांलगत खुर्च्या, बेंच ठेवले जाणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर खुर्च्या, बेंचची व्यवस्था करावी लागणार असून, जिल्हा प्रशासनाने आतापासूनच यासंदर्भातील तयारीचे आदेश दिले आहेत. मध्यमवयीन महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, अंशत: दिव्यांग यांना मतदान केंद्रावर कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ही सुविधा दिली जाणार आहे. यासोबतच मतदान केंद्रावर पेंडाल, रॅम्प, सीसीटीव्ही, प्रकाश व्यवस्था, पाण्याची सोयही अनिवार्य करण्यात आली आहे. ग्रामीण भागासह आदिवासी भागातील मतदान केंद्रांकडे विशेष लक्ष देत तेथे आधीच सर्व सोयी, सुविधा उभ्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यासंदर्भात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. रांगांमध्ये बसण्याची सोय राहणारच असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. तसेच याबाबत मतदारांना माहिती मिळावी, याचेही प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. अनेकदा ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, प्रसूती झालेली महिला, तान्हे बाळ असलेली महिला, मध्यमवयीन लांबच लांब रांगांमध्ये उभे राहण्याचा कंटाळा करतात. त्याचा परिणाम एकुण मतदानाच्या टक्केवारीवर होतो. मतदान कमी होते. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काही बाबी साधारण वाटत असल्या तरी त्या आवश्यक आहेत. विदेशात मतदान रांगेत अशी सोय असते. त्यामुळे नागरिक थकले की त्यांना खुर्ची, बेंचवर बसता येते. त्यामुळे मतदान प्रक्रिया आणखी सुलभ होते. यंदाही मतदानाची टक्केवारी वाढावी, या दृष्टीने आवश्यक ते सर्व उपाय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा निवडणूक विभाग व जिल्हा प्रशासनासह केले जाणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article