मतदानाचा हक्क बजावतानाच तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू:सातारा जिल्ह्यातील घटना; मृत माजी सनदी लेखापाल
1 day ago
2
सातारा सातारा जिल्ह्यातील मोरवे ( ता. खंडाळा) येथील एका व्यक्तीला मतदानकेंद्रामध्ये मतदानाचा हक्क बजावतानाच तीव्र हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मोरवे, ता. खंडाळा येथील प्राथमिक शाळेमध्ये प्रशासनाकडून निवडणूक कक्षात मतदान सुरु होते. यावेळी शाम नानासाहेब धायगुडे (वय 67) हे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानकेंद्रावर दाखल झाले. ओळखपत्राची पडताळणी झाल्यानंतर ते इव्हीएम कक्ष (मतदान यंत्र) पोहोचले. त्यांनी मतदानयंत्राचे बटण दाबले आणि याचवेळी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे ते जागीच कोसळले. मतदान केंद्रावर कर्तव्यास असलेल्या कर्मचार्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीस जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच धायगुडे यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. मृत धायगुडे हे मुंबई येथे सनदी लेखापाल (चार्टड अकौंटंट) होते. परंतू काही वर्षांपूर्वीच ते आपल्या मूळ गावी म्हणजेच मोरवे, ता. खंडाळा येथे स्थायिक झाले होते. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोग आवाहन करीत असते. शहरातील उच्चभ्रू व उच्चविद्याविभूषित लोकही मतदानादिवशी मतदानाकडे पाठ फिरवून पर्यटनास निघून जातात. परंतू व्यवसायाने सनदी लेखापाल असलेले व गावाकडे येवून शेती करीत आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य जगत असलेल्या धायगुडेंना मतदानाचा हक्क बजावतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)