Published on
:
20 Nov 2024, 5:39 pm
Updated on
:
20 Nov 2024, 5:39 pm
वर्धा : जिल्ह्यातील चारही विधानसभा निवडणुकीकरीता मतदान शांततेत पार पडले. सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत ६३.३९ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. काही मतदान केंद्रांवर महिला व युवा मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले. यात नवमतदार, महिला, दिव्यांग मतदार व जेष्ठ नागरिकांचा समावेश होता. प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रावर सोई सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. आर्वी ६४.२२ टक्के, देवळी ६२.८१ टक्के, हिंगणघाट ६५.३३ टक्के, वर्धा विधानसभा मतदार संघात ६१.३३ टक्के मतदान झाले.
आर्वी मतदार संघात २ लाख ६५ हजार ४२० मतदार असून यामध्ये १ लाख ३३ हजार ५९८ पुरूष तर १ लाख ३१ हजार ८२० महिला असून २ इतर मतदारांचा समावेश आहे. यापैकी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ८७ हजार ४८ पुरुष मतदारांनी, ८३ हजार ३९५ स्त्री मतदारांनी असे १ लाख ७० हजार ४४३ मतदारांनी मतदान केले.
देवळी मतदार संघात २ लाख ७४ हजार ६०८ मतदार असून यामध्ये १ लाख ३८ हजार ५३८ पुरूष तर १ लाख ३६ हजार ७० महिला आहे. यापैकी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ८७ हजार २५४ पुरुष मतदारांनी, ८५ हजार २३८ स्त्री मतदारांनी असे १ लक्ष ७२ हजार ४९२ मतदारांनी मतदान केले.
हिंगणघाट मतदार संघात २ लाख ९७ हजार ५४७ मतदार असून यामध्ये १ लाख ५१ हजार ५३८ पुरूष तर १ लाख ४६ हजार ९ महिला आहे. यापैकी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १लाख ६६६ पुरुष मतदारांनी ९४ हजार ६०५ स्त्री मतदारांनी असे १ लक्ष ९५ हजार २७१ मतदारांनी मतदान केले.
वर्धा मतदार संघात एकुण मतदार २ लाख ९४ हजार ७५१ मतदार असून यामध्ये १ लाख ४७ हजार ४११ पुरूष तर १ लाख ४७ हजार ३२९ महिला असुन ११ इतर मतदार आहे. यापैकी ५ वाजेपर्यंत ९१ हजार ७५७ पुरुष मतदारांनी, ८८ हजार ९९४ स्त्री मतदारांनी तर इतर ८ मतरांनी असे १ लाख ८० हजार ७५९ मतदारांनी मतदान केले.
वर्धा जिल्हृयातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजतापासूनच मतदारांनी हजेरी लावली होती. ठिक-ठिकाणी मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसल्या. दिव्यांग व वरिष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. उमेदवारांनीही मतदानाचा हक्क बजावला.