मुंबई शहर जिह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी दहा वेगवेगळय़ा मतमोजणी केंद्रांवर होणार आहे. मतमोजणीदरम्यान केंद्रामध्ये मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास बंदी राहणार आहे. तर मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असून विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणीसाठी 14 टेबल तर टपाल मतमोजणी करण्यासाठी 14 टेबलची व्यवस्था केली असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.
मतमोजणी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱयांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर स्कतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच टपाली मतमोजणीसाठी कडाळा, माहीम आणि वरळी विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 5 टेबल, भायखळा आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 4, धारावी, शिवडी आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 3 टेबल तर सायन-कोळीवाडा आणि मुंबादेवी मतदारसंघासाठी प्रत्येकी 2 असे एकूण 36 टेबल असतील. सेवा मतदारांच्या पूर्कमतमोजणीसाठी जिह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक असे एकूण 10 टेबल असतील. सकाळी 8 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुकात होईल. त्यानंतर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुकात होईल. मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांवडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
300 मीटर परिसरात मनाई आदेश लागू
मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या संदर्भात गुंतलेला अधिकारी किंवा अशा मतमोजणी केंद्रावर किंवा त्यांच्या परिसरात कर्तव्यात गुंतलेल्या कोणत्याही लोकसेवकाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने मतमोजणी केंद्रापासून अथवा मतमोजणी केंद्राच्या परिसरापासून 300 मीटर त्रिज्येच्या अंतरात, महामार्ग रस्ता, गल्लीबोळ किंवा इतर कोणत्याही सार्कजनिक ठिकाणी फिरणे किंवा कोणत्याही लोकांच्या सभा किंवा गट तयार करण्यास व सामील होण्यास मनाई असेल, असे आदेश पोलीस प्रशासनाने निर्गमित केले आहेत.
ही आहेत मतमोजणी केंद्रे
- धारावी – भारतरत्न राजीव गांधी जिल्हा स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, धारावी बस डेपो रोड, धारावी.
- सायन कोळीवाडा – न्यू सायन म्युनिसिपल स्कूल, सायन (पूर्व), लायन्स ताराचंद बाप्पा हॉस्पिटलजवळ.
- वडाळा – महानगरपालिका न्यू बिल्डिंग, स्वमी वाल्मीकी चौक, हनुमान मंदिराजवळ, विद्यालंकार मार्ग, अँटॉप हिल.
- माहीम – इमराल्ड हॉल, डॉ. अँटोनिया डिसिल्व्हा माध्यमिक शाळा, रावबहादूर एस. के. बोले रोड, दादर (प.)
- वरळी – पश्चिम रेल्वे जिमखाना हॉल,सेनापती बापट मार्ग, महालक्ष्मी क्रीडा मैदान.
- शिवडी – म्युनिसिपल प्रायमरी मराठी शाळा क्र. 2, ना. म. जोशी मार्ग, करी रोड (प.)
- भायखळा – रिचर्डसन ऍण्ड क्रुडास कंपनी लिमिटेड, सर जे. जे. रोड, भायखळा.
- मलबार हिल – विल्सन कॉलेज हॉल तळमजला, रूम नं 102, 104, नेताजी सुभाषचंद्र मार्ग, चर्नी रोड.
- मुंबादेवी – महानगरपालिका शाळा तळमजला, गिल्डर लेन, मुंबई सेंट्रल स्टेशन.
- कुलाबा – सर जे. जे. ऑफ अप्लाईड आर्टस्, एक्झिबिशन हॉल, सीएसएमटी स्टेशन, फोर्ट.
- बोरिवली – 13/सी एफसीआय गोडाऊन, बोरिवली (पू.)
- दहिसर – रुस्तुमजी बिझनेस कॉम्प्लेक्स, महानगरपालिका मंडई बिल्डिंग, दहिसर (प.)
- मागाठाणे – कॅण्टीन हॉल, सीटीआयआरसी, अभिनव नगर, राष्ट्रीय उद्यानाजवळ, बोरिवली (पू.)
- कांदिवली पूर्व – पालिका सोशल वेल्फेअर सेंटर, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पू.)
- चारकोप – बजाज म्युनिसिपल स्कूल, बजाज रोड, कांदिवली (प.)
- मालाड पश्चिम – टाऊनशिप म्युनिसिपल हिंदी सीबीएससी इंग्लिश, मालवणी-मार्वे रोड.
- जोगेश्वरी पूर्व – बॅडमिंटन हॉल, न्यू जिमखाना बिल्डिंग, इस्माईल युसूफ कॉलेज कंपाऊंड, जोगेश्वरी (पू.)
- दिंडोशी – मुंबई पब्लिक स्कूल, कुरार व्हिलेज, मालाड (पू.)
- गोरेगाव – उन्नत नगर मुंबई पब्लिक स्कूल, उन्नत नगर 2, गोरेगाव (पू.)
- वर्सोवा – शहाजीराजे भोसले स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, आझाद नगर, अंधेरी (प.)
- अंधेरी पश्चिम – एसएनडीटी महिला विद्यापीठ, जुहू रोड, सांताक्रुझ (प.)
- अंधेरी पूर्व – गावदेवी महापालिका शाळा, मथुरादास रोड, अंधेरी (पू.)
- मुलुंड – मुंबई पब्लिक स्कूल, मिठागर रोड, मुलुंड (पू.)
- विक्रोळी – एम. के. ट्रस्ट सेकंडरी
स्कूल मुख्य इमारत, कन्नमवार नगर, विक्रोळी (पू.) - भांडुप – सेंट झेवियर्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, एल. बी. एस. रोड, कांजूरमार्ग (प.)
- घाटकोपर पश्चिम – मुंबई पब्लिक स्कूल, वर्षा नगर, वीर सावरकर मार्ग, कैलाश कॉम्प्लेक्स पार्कसाईट, विक्रोळी (प.)
- घाटकोपर पूर्व – मुंबई पब्लिक स्कूल, पंतनगर नं. 3 कॉम्प्लेक्स, घाटकोपर (पू.)
- मानखुर्द – शिवाजी नगर-म्युनिसिपल मॅटर्निटी हॉस्पिटल, लल्लूभाई कंपाऊंड, मानखुर्द.
- विलेपार्ले – मुंबई पब्लिक स्कूल, विलेपार्ले (प.) म्युनिसिपल मराठी प्राथमिक शाळा, कमला नगर, विलेपार्ले (प.)
- चांदिवली – आयटीआय, किरोळ रोड, विद्याविहार (प.)
- कुर्ला – शिवसृष्टी कामराज नगर, महापालिका शाळा, कुर्ला (पू.)
- कलिना – मल्टिपर्पज हॉल,
मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस,
सांताक्रुझ (पू.) - वांद्रे पूर्व – ग्रीन टेक्नॉलॉजी बिल्डिंग, मुंबई विद्यापीठ, कलिना.
- वांद्रे पश्चिम – आर. व्ही. टेक्निकल हायस्कूल, खार (प.)
- अणुशक्ती नगर – लोरेटो कॉन्व्हेंट स्कूल, आरसीएफ कॅम्पस, चेंबूर.
- चेंबूर – आरसीएफ स्पोर्टस् क्लब, बॅडमिंटन हॉल, आरसीएफ कॉलनी, आर. सी. मार्ग, चेंबूर.