मतमोजणी केंद्राच्या परिसरातील 5 किलोमीटर अंतरापर्यंत ड्रोनद्वारे वॉच ठेवला जाणार:पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची माहिती
5 hours ago
1
हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात पाच किलोमीटर अंतरापर्यंत ड्रोन द्वारे ग्रस्त घातली जाणार असून विनापरवानगी रॅली काढणे व डीजे वाजविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे हिंगोली जिल्ह्यांमध्ये हिंगोली सह कळमनुरी वसमत विधानसभा मतदारसंघात शनिवारी तारीख 23 सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. मतमोजणी साठी येणाऱ्या उमेदवार प्रतिनिधींना मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र यावेळी त्यांची ओळखपत्रे तपासली जाणार आहे ज्या प्रतिनिधीकडे ओळखपत्र नसेल त्यांना मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल नेता येणार नाही. जिल्ह्यातील तीनही मतमोजणी कक्षाच्या बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मतमोजणीच्या वेळी मतमोजणी केंद्राच्या बाहेर घोषणाबाजी करणाऱ्या तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरामध्ये असलेल्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी स्पॉट वॉचर पथके तैनात केले जातील. तीन विधानसभा मतदारसंघासाठी पंधरा पथके तैनात असतील. याशिवाय तीन ड्रोन कॅमेरा द्वारे लक्ष ठेवले जाणार असून मतमोजणी केंद्राच्या परिसरातील पाच किलोमीटर अंतरापर्यंत ड्रोन कॅमेराचा वॉच असणार आहे. दरम्यान मतमोजणीनंतर विनापरवानगी मिरवणूक काढता येणार नाही तसेच फटाके फोडणे, डीजे वाजवणे आदी प्रकार करता येणार नाही. विनापरवानगी मिरवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे. दरम्यान कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला आहे.शिवनी ते कळमनुरी लमानदेव पर्यंतच्या मार्गावर जड वाहनांना पूर्णपणे वाहतूक बंद असणार आहे. कळमनुरी शहरात येणारी वाहने बायपास मार्गे वाई पुलावरून कळमनुरी शहरात येतील.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)