मधमाशांच्या हल्ल्यात शेतकरी पती मृत्युमुखी तर पत्नी जखमी

1 hour ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

17 Oct 2024, 2:22 pm

Updated on

17 Oct 2024, 2:22 pm

जळगाव : तालुक्यातील वडली येथील शेत शिवारामध्ये काम करीत असताना शेतकरी दांपत्यावर मधमाशांच्या झुंडीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पतीचा मृत्यू झाला आहे. पत्नीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील वडली येथे विकास चूडामण पाटील (वय ५५, रा. वडली ता. जळगाव) हे पत्नी, दोन मुले यांच्यासह राहत होते. ते शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. गुरूवारी (दि.१७) जवखेडा शिवार येथे सकाळी १० ते ११ वाजताच्या दरम्यान शेतात काम करीत असताना अचानक मधमाशांच्या झुंडीने विकास पाटील आणि त्यांची पत्नी रत्‍नाबाई विकास पाटील (वय ५०) यांच्यावर हल्ला केला केला. ग्रामस्थांना कळताच त्यांनी दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विकास चुडामन पाटील यांना तपासून मृत घोषित केले. तर रत्‍नाबाई विकास पाटील यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. प्रगतशील शेतकरी आणि मनमिळाऊ स्वभावाचे विकास पाटील यांच्या मृत्यूमुळे वडली गावामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article