मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ निघालेली मुस्लीम बांधवांची पदयात्रा पोलिसांनी रोखली:आयोजकांवर गुन्हा दाखल, 6 तास पोलिसांनी थांबवून ठेवल्याचा आरोप

2 hours ago 2
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी क्रांती चौक येथून निघालेली मुल्सिम बांधवांची पदयात्रा कायदा सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी रविवारी मोढा नाका उड्डाण पुलाजवळ अडवली. या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सहा तास पोलिसांनी थांबवून ठेवले, असा आरोप आयोजक कलीम सलीम पटेल यांनी केला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे. सगे-सोयऱ्यांचा कायदा पारित करण्यात यावा, या मागणीसाठी गेल्या एक वर्पांपासून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारंगे पाटील लढा देत आहे. याच मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरंगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. या उपोषणामुळे जरांगे पाटील यांची वारंवार तब्येत खराब होत आहे. याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या उपोषणाला मुस्लिम बांधवांकडून पाठिंबा दिला आहे. मुल्सिम बांधवांनी उपोषणाच्या समर्थनार्थ क्रांती चौक ते अंतरवाली सराटी अशी पदयात्रा रविवारी, २२ सप्टेंबर रोजी काढली होती. रविवारी सकाळी ११ वाजता क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रा रवाना झाली होती. परंतु, पदयात्रेमुळे कायदा सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी रविवारी मोढा नाका उड्डाण पुलाजवळ अडवली. या प्रकरणी आयोजक कलीम सलीम पटेलसह इतरांवर कलम १३२ म्हणजे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती क्रांती चौक पोलिसांनी दिली. १२ ते ६ वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात दांबून ठेवले : मराठा आणि मुल्सिम बांधवांमध्ये एक्याचे वातावरण आहे. मनोज जरांगे यांची तब्येत बिघडत असताना सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जरांगे यांना समर्थन देण्यासाठी आम्ही पदयात्रा काढली होती. परंतु, तीपोलिसांनी अडवली. आम्हाला १२ ते ६ वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात दांबून ठेवले. कलीम सलीम पटेल, आयोजक..

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article