मराठा आरक्षणासाठी आज जिल्हा बंद:मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नगरमध्ये मराठा बांधवांचे उपोषण‎

2 hours ago 2
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणास बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ नगर शहरातही मराठा समाजाचे प्रतिनिधी शुक्रवारपासून (२० सप्टेंबर) आमरण उपोषणास बसले आहेत. आता नगर जिल्हा मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (२३ सप्टेंबर) जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. अखंड मराठा समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला याबाबत रविवारी निवेदन देण्यात आले आहे. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करणे, शिंदे समितीस मुदतवाढ देऊन तिचे कामकाज चालू ठेवावे, मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, हैदराबाद, सातारा, मुंबई गॅझेट लागू करावे आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्याने अखंड मराठा समाजाच्यावतीने नगर तहसील कार्यालय येथे गोरख दळवी, संतोष आजबे, सखाराम गुंजाळ हे आमरण उपोषणास बसले आहेत. आता आज समाजाच्या वतीने जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. बंद दरम्यान अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार असेल, असे निवेदनात म्हटले आहे. आंदोलन, जिल्हा बंद शांततेच्या मार्गाने आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू केले आहे. सोमवारी (२२ सप्टेंबर) जिल्हा बंदची हाक दिली आहे. शैक्षणिक संस्था, व्यापारी, शाळेसाठी वाहतूक करणारे वाहन चालक, रिक्षा, एसटी, एएमटी बससेवेने एक दिवस बंद ठेवून साथ द्यावी, ही विनंती. जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार आरक्षण मिळेपर्यंत शांततेच्या मार्गाने असून जिल्हा बंदही शांततेतच करायचा आहे. - गोरख दळवी, उपोषणकर्ते. बंदोबस्त लावण्याचे पोलिस ठाण्यांना आदेश नगर जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना आपापल्या हद्दीत पोलिस बंदोबस्त लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगर शहरातही तोफखाना व कोतवाली ठाण्याच्या पोलिसांना बंदोबस्त लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article