मविआमध्ये जिल्ह्यातील नऊ पैकी ‎पाच मतदारसंघांत रस्सीखेच कायम:कन्नड, वैजापूर, पश्चिम उद्धवसेना तर फुलंब्री काँग्रेसकडे‎

2 days ago 3
महाविकास आघाडीच्या घटक ‎‎पक्षातील म्हणजे उद्धवसेना, ‎‎काँग्रेस, शरद पवार गटांमध्ये ‎‎जिल्ह्यातील चार मतदारसंघाबाबत‎निश्चिती झाल्याची माहिती सूत्रांनी‎दिली आहे. त्यामध्ये शहरातील पश्चिम‎तर ग्रामीण भागातील फुलंब्री, वैजापूर, ‎‎कन्नड या मतदारसंघाचा समावेश‎आहे, तर पाच मतदारसंघाबाबत‎अजूनही चर्चा सुरु आहे. सध्या ‎‎शिवसेनेकडे पश्चिम, वैजापूर आणि‎ कन्नड तर फुलंब्री मतदारसंघ‎ काँग्रेसकडे असेल, अशी माहिती‎सूत्रांनी दिली. जिल्ह्यात शिवसेनेचे सहा ‎‎आमदार होते. त्यापैकी पाच आमदार ‎‎शिंदेसेनेकडे गेेले. उद्धवसेनेचे‎खासदारही पराभूत झाले. त्यामुळे ‎‎उद्धवसेनेला मतदारसंघ सोडवून‎घेण्यासाठी झगडावे लागत आहे. पैठण, ‎‎सिल्लोड, गंगापूर मतदारसंघावर‎शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि‎काँग्रेस यांनीही दावा केला आहे. सुत्रांनी ‎‎सांगितले की, अंतिम टप्प्यात शरद‎पवारच कोणत्या पक्षाने , कोणत्या जागा ‎‎लढवाव्यात याचा निर्णय घेतील.‎ फुलंब्री काँग्रेसकडेच राहणार‎ काँग्रेसने फुलंब्री मतदारसंघात कायम‎निवडणूक लढवली आहे. २००९ मध्ये‎कल्याण काळे निवडून आले होते. आता‎काळे खासदार आहेत. त्यांच्या फुलंब्री‎मतदारसंघात लोकसभेला १ लाख १२‎हजार ७२० मते मिळाली आहेत. त्यामुळे ही‎जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला.‎ पश्चिममध्ये तीन टर्मपासून ‎शिवसेनेचा उमेदवार‎ पश्चिम मतदारसंघात तीन टर्मपासून‎शिवसेनेचे आमदार आहेत. या‎मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी‎राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड,‎चंद्रकांत खैरे हे इच्छुक आहेत. शिरसाठ‎सातत्याने उद्धवसेनेवर आरोप करत‎असल्यामुळे त्यांना पराभूत करण्यासाठी‎तयारी केली जात आहे.‎ शिवसेनेचा सहा मतदारसंघांवर दावा ग्रामीण भागात उद्धव सेना वैजापूर,‎कन्नड, सिल्लोड, पैठण या मतदारसंघावर दावा करत आहे. यामध्ये सध्या वैजापूर आणि‎कन्नड या दोन मतदारसंघाबाबत उद्धव सेनेला देण्याच्या बाबत शिक्कामोर्तब झाल्याची‎चर्चा आहे, तर पैठण, सिल्लोडबाबत चर्चा सुरु आहे.‎ पूर्व, मध्य मतदारसंघामध्ये‎ दाव्यावरून वाद कायम‎ पूर्व मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेसचा‎मतदारसंघ राहिला आहे. येथे काँग्रेससह‎शिवसेनेने दावा केला आहे. मध्यमध्येही‎काँग्रेस दावा करत आहे. येथे शिवसेनेचे‎आमदार तीन वेळा निवडून आले. हा‎ मतदारसंघ शिवसेनाच लढणार असल्याचा‎दावा वरिष्ठ पातळीवर करण्यात आला‎आहे.‎ शरद पवारच घेतील अंतिम निर्णय‎ कन्नड मतदारसंघात उद्धवसेनेचे आमदार‎आहेत. त्यामुळे राजपूत यांनी गेल्या काही‎दिवसांपासून त्यांच्या मतदारसंघात प्रचाराला‎सुरुवात केली आहे, तर वैजापूर‎मतदारसंघात रमेश बोरनारे यांना ९८१८३ मते‎(५० टक्के) मिळाली होती. ही जागा‎उद्धवसेनेला मिळाली आहे.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article