महामंडळ नको, विधिमंडळच पाहिजे; सत्ताधारी तीन नेत्यांनी नाकारली पदे:बंडोबांना थंड करण्याचा फडणवीस, अजितदादांचा प्रयत्न फसला

10 hours ago 1
महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना विरोध करू शकतात किंवा अडचणीत आणू शकतात अशा २७ नेत्यांना बाजूला हटवण्यासाठी सरकारने महामंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यपदाचे गाजर दाखवले. पण नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर २४ तासांतच त्यातील तिघांनी हे गाजर नाकारले. त्यातील भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि अजित पवार गटाचे नेते बापू भेगडे शरद पवार गटाकडून विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, महामंडळ नाकारणारे तिसरे हिंगोलीचे भाजप नेते रामराव वडकुतेंनी पुढील वाटचाल जाहीर केलेली नाही. सूत्रांनी सांगितले की, महायुतीच्या जागावाटपात प्रत्येक जागेवर पक्षातून कोणाचा विरोध होऊ शकतो आणि त्याचा किती फटका बसेल, याचा विचार झाला. त्यावर उपाययोजना म्हणून संभाव्य विरोधकांना महामंडळाचे गाजर दाखवण्यात आले. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महामंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यपदी नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. १६ आॅक्टोबर रोजी त्याची घोषणाही झाली. मला जे पाहिजे तेच द्या : भेगडे पत्रकार परिषदेत भेगडे म्हणाले की, मला महामंडळ नकोय. मी ज्या गोष्टीची मागणी केली होती त्यावर मी ठाम आहे. माझ्या मागणीवर माझे कार्यकर्ते ठाम आहेत. अजितदादा, तुम्ही मला जे पाहिजे तेच द्या. भेगडे हे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष, संत तुकाराम साखर कारखान्याचेही उपाध्यक्ष असून दादा गटाचेच आ. सुनील शेळके यांचे कट्टर विरोधक आहेत. दोघांना आपल्याच पक्षाच्या आमदारांविरुद्ध लढायचेय परिचारकांना महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळ अध्यक्षपद, तर भेगडेंना कृषी शिक्षण, संशोधन परिषद उपाध्यक्षपद देण्यात आले. पण परिचारकांना पंढरपूर-मंगळवेढ्यात भाजपचे आ. आवताडे तर भेगडेंना मावळमधून अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळकेंविरुद्ध लढायचे आहे. नवी मुंबईत भाजप नेते आ. नाईकांचे विरोधक शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांची कै. मारुती चव्हाण वडार महामंडळ उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांची नाराजी मुख्यमंत्री शिंदेंनी दूर केल्याचे म्हटले जात आहे. परिचारकांची पवारांशी चर्चा पंढरपूर -मंगळवेढा येथे भाजपचे समाधान आवताडे आमदार आहेत. त्यांनाच संधी दिली जाणार असल्याने प्रशांत परिचारक अस्वस्थ आहेत. त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. परिचारक हे भाजपचे विधान परिषदेवर आमदार होते. सैनिकांच्या पत्नींविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल त्यांना २०१७ मध्ये परिषदेतून निलंबित केले होते. मला नको, दुसऱ्याला संधी द्या : वडकुते हिंगोली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी काम करण्यास भाजपचे रामराव वडकुते यांनी नकार दिला अाहे. मी दोनदा या महामंडळ‌ाच्या अध्यक्षपदावर काम केले आहे. म्हणून आता नवीन कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी विनंती त्यांनी सोशल मीडियावरून केली आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दिसत असली तरी त्यांनी विधानसभा लढवण्याविषयी कोणतेही भाष्य केलेले नाही. महत्त्वाची बाब म्हणजे महामंडळ अध्यक्षपदी नियुक्तीपत्रात रामरावांऐवजी विजय वडकुते असे नाव होते. ही चूक निदर्शनास आल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवे नियुक्तीपत्र जारी केले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article