महायुतीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले, मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज निर्णय?File Photo
Published on
:
24 Nov 2024, 4:31 am
Updated on
:
24 Nov 2024, 4:31 am
मुंबई : पुढारी ऑनलाईन
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काल स्पष्ट झाले. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला बहुमत दिल्याचे स्पष्ट झाले आहे. आता महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बनवण्याच्या हलचालींनी वेग घेतला आहे. मुंबईत महायुतीच्या निवडून आलेल्या आमदारांची बैठक होणार असून त्यादरम्यान विधीमंडळ पक्षाच्या नेत्याचीही निवड होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय घेतला जाऊ शकतो. यादरम्यान महायुतीच्या तीन्ही पक्षांची बैठक होणार आहे. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष स्वतंत्र बैठका घेतल्या जाउ शकतात.