महाराष्ट्र विधानसभा निवडणूक:भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
2 hours ago
1
कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला. तसेच भारत निवडणूक आयोगाच्यावतीने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले. कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये १५ व १६ नोव्हेंबर रोजी नमुना १२ ड भरुन दिलेल्या ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांचे गृहभेटीद्वारे मतदान नोंदवून घेण्यात येत आहे. त्यापैकी आज ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले ९१ जेष्ठ नागरिक तसेच ४ दिव्यांग मतदार असे एकूण ९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.या प्रक्रियेकरिता विधानसभा मतदारसंघात एकूण आठ पथकांची स्थापना करण्यात आली आहे, पथकाच्यावतीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत मतदारांच्या घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे. कॅन्टोन्मेंट मतदार संघात ९३ मतदारांनी केले गृहमतदान पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा (अ.जा.) मतदारसंघांतर्गत ८५ वर्षांवरील ९१ ज्येष्ठ नागरिक व ६ दिव्यांग अशा एकूण ९७ मतदारांनी अर्ज क्रमांक १२ ड भरून गृहमतदानासाठी नोंदणी केलेल्या ८५ वर्षांवरील ८९ ज्येष्ठ नागरिक व ४ दिव्यांग मतदार अशा एकूण ९३ मतदारांनी गृहमतदान केले. विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मतदानाची प्रक्रिया करण्यात आली. टपाली मतदान कक्षाचे समन्वय अधिकारी पी.के. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांचे गृह भेटीत मतदान करून घेण्यासाठी एकूण ८ पथकांचे गठन करण्यात आले होते. त्यामध्ये एक मतदान अधिकारी, एक इतर अधिकारी , एक पोलीस कर्मचारी व एक शिपाई , एक व्हिडिओ ग्राफर व एक सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश आहे. गृह मतदानासाठी कार्यरत असणाऱ्या विशेष पथकाद्वारे ही प्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी दिली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)