महाराष्ट्राच्या मानेवर जरांगे नावाचे वटवाघूळ बसू देणार नाही:जिथे जरांगेचा उमेदवार तिथे ओबीसी उमेदवार उभा करणार, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

3 days ago 2
महाराष्ट्रावर मनोज जरांगे नावाचे वटवाघूळ बसू देणार नाही, असा हल्लाबोल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होताच मराठा नेते मनोज जरांगे यांनी महायुती सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. यानंतर लक्ष्मण हाके यांनी देखील जरांगे यांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. काय म्हणाले लक्ष्मण हाके? महाराष्ट्राच्या मानेवार जरांगे नावाचे वटवाघूळ बसू देणार नाही. जिथे जिथे जरांगे पाटील उमेदवार देतील तिथे ओबीसीचा उमेदवार असेल, असे लक्ष्मण हाके यांनी सांगितले आहे. घराणेशाही पुरस्कृत असलेल्या शरद पवार आणि इतर नेत्यांना ओबीसीला महत्त्वाचे पद द्यावे, असे का कधी वाटले नाही? असा सवाल देखील लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, ही निवडणूक आरपारची आहे. आता नाही तर पुन्हा लवकर नाही. राज्यातील सत्तेत असलेली महत्त्वाची पदे कधीच ओबीसी नेत्याच्या वाटेला आली नाहीत. आता ओबीसी गप्प बसणार नाहीत, तो चांगला धडा शिकवेल, असा इशारा हाके यांनी दिला आहे. काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यावर मनोज जरांगे यांनी महायुती सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी टार्गेट केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना बेदखल करण्याचे काम केले आहे. सरकारकडून मराठ्यांना आशा होती की, सरकार आपल्या लेकरांना आरक्षण देईल. पण ती आशा आता सरकारने संपवली आहे. मराठ्यांची पोरं आरक्षणापासून वंचित राहिली पाहिजेत, भिकारी झाली पाहिजेत यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या विरोधात काम केले, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करणार की नाही हे अद्याप समजू शकले नाही. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव लोकसभा निवडणुकीच्यावेळी दिसून आला. याचा फटका महायुती सरकारला बसला होता. आता विधानसभेच्या निवडणुकीत देखील फटका बसणार का याकडे आता लक्ष असणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article