महाराष्ट्राला लुटण्याचे काम सुरू:अडीच वर्ष न्याय मागतोय, पण मिळत नाही; प्रचार संपण्याआधी उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद

2 hours ago 1
निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवट दिवस आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रचार संपण्याच्या काही तास आधी मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. सध्या महाराष्ट्र लुटण्याचे, गुलाब बनवण्याचे काम सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. माझ्याकडून त्यांनी आपला पक्ष, निशाणी सगळे हिसकावून घेतले. पण त्यांना तुमचे प्रेम माझ्याकडून घेता आले नाही. मी केवळ आपल्या आशीर्वादामुळे ठामपणे उभा आहे. महाराष्ट्रातील बेबंदशाही रोखण्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा, असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. न्यायासाठी मी आपल्या दरबारात आलोय अडीच वर्षांपूर्वी आपले सरकार सुरळीतपणे सुरू होते. आपले सरकार त्यांनी कोणत्या पद्धतीने पाडले आणि आपल्या माथ्यावर आपल्या इच्छेविरुद्ध कशाप्रकारे कोणते सरकार बसवण्यात आले. आपल्याला काय भोगावे लागत आहे. अडीच वर्षांपासून न्याय मागत आहोत. पण अजुनही न्याय मिळत नाही. न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे असे म्हटले जाते. आम्हालाही एकप्रकारे न्यायालयाकडून न्याय नाकारला जात आहे. लोकमान्य टिळक म्हटल्याप्रमाणे मी आपल्या दरबारात न्याय मागण्यासाठी आलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मला तुमचे आशीर्वाद हवेत या लोकांना आपला पक्ष चोरला. बेगुमानपणाने वागून दिवसाढवळ्या पक्षावर दरोड टाकला. पक्ष चोरल, पक्षाचे नाव अगदी शिवसेना प्रमुखांचा फोटेही त्यांनी चोरला आणि त्यांचे विचार घेऊन पुढे जात असल्याचे ते म्हणत आहेत. मी केवळ आपल्या आशीर्वादामुळे ठामपणे उभा आहे. माझ्याकडून त्यांनी सगळे चोरले असे त्यांना वाटत असेल, पण ते माझ्याकडून तुमचे प्रेम, आशीर्वाद चोरू शकत नाहीत. तुमचे प्रेम आणि आशीर्वादाच्या पाठिंब्यावर मी बेबंदशाहीविरोधात लोकशाहीची लढाई लढत आहे. त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवेत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न ही लढाई मला काही मिळवण्यासाठी नाही, तर देशातील लोकशाही टिकवण्यासाठी मला तुमची सोबत पाहिजे. या लढाईत केवळ माझ्या नाही, तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राला लुटायचे, गुलाम बनवण्याचे काम सुरू आहे आणि आपण ते डोळ्यादेखत होऊ द्यायचे? मला तरी ते पटत नाही. त्यामुळे या लढाईत सहकुटुंब उतरा. आपल्या कुटुंबातील सर्व मतदारांनी या लढाईत सहभाग घ्या. जिथे जिथे शिवसेनेचे उमदेवार आहेत, त्यांना भरघोस मते द्या. त्यांची निशाणा आहे बाळासाहेबांची मशाल, शिवसेनाप्रमुखांची मशाल, हिंदूहृदयसम्राटांची मशाल. प्रत्येकाने मी बाळासाहेबांची मशाल आहे या जिद्दीने उतरून बेबंदशाही आपल्या मताने जाळून भस्म करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article