महिलेची छेड काढल्याने तुंबळ हाणामारी:सातारा शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल

4 days ago 3
सातारा शहरातील कमानी हौद येथे दुर्गा देवी मिरवणूकीवेळी महिलेची छेडछाड करत विनयभंग झाल्‍याने तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात परस्‍परविरोधी तक्रारी दाखल झाल्‍या आहेत. दि. 12 ऑक्‍टोबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. महिलेने पहिल्‍या दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे की, कुटुंबीयांसोबत दुर्गा देवी मिरवणूक पाहत असताना दोघेजण तेथे आले. 'मॅडम किती दिवस झाले तुम्‍हाला पाहतोय. आज मिरवणूक आहे. गर्दी पण आहे. तुम्‍हाला मिरवणूक दाखवून आणतो,' असे म्‍हणत महिलेचा हात पकडला. या घटनेनंतर महिलेने हात झटकून सुटका करुन घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्‍यानंतर त्‍यांनी दोघांविरुध्द विनयभंगाचा गुन्‍हा दाखल केला. या घटनेनंतर धक्‍का लागल्‍याच्या कारणावरुन वाद होवून महिलेच्या कुटुंबियांतील एकाने मित्रासोबत दोघांना मारहाण केली. शिवीगाळ करत डोक्‍यात दगड मारुन जखमी केले असल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे. पोलिसांनी याची तक्रार घेवून दोघांविरुध्द गुन्‍हा दाखल केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article