महिलेच्या पोटात लाथा मारत गर्भपाताचे दिले खाजगी औषध:पती विरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

4 days ago 2
वसमत तालुक्यातील डोणवाडा येथील गर्भवती महिलेच्या पोटात लाथ मारल्यानंतर गर्भपाताचे खाजगी औषध देऊन गर्भपात करणाऱ्या निलंगा येथील पती विरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात रविवारी ता. 13 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हा निलंगा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील डोणवाडा येथील यशोदाबाई यांचा विवाह एक वर्षापासून निलंगा (जि. लातूर) येथील शंकर हिरास याच्या सोबत झाला होता. लग्ना नंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर शंकर याने त्यांना त्रास देण्यास सुरवात केली. त्यानंतर यशोदाबाई ह्या दोन महिन्याच्या गर्भवती झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना आणखीच त्रास देण्यास सुरवात केली होती. दरम्यान, गर्भपात करण्यासाठी त्यांना त्रास दिला जाऊ लागला होता. मात्र त्यांनी गर्भपात करण्यास नकार दिल्यानंतर शंकर याने ता. १० ऑक्टोबर रोजी त्यांना मारहाण केली. तसेच पोटात लाथाही मारल्या. त्यानंतर त्यांना गर्भपातासाठी दुधामध्ये खाजगी औषध देऊन त्यांचा गर्भपात केला. या औषधामुळे तसेच मारहाणीमुळे त्यांची प्रकृती अत्यावस्थ झाली. त्यानंतर त्यांना डोणवाडा येथे आणून सोडले. त्यांच्या माहेरच्या मंडळींनी त्यांना उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी यशोदाबाई हिरास यांनी दिलेल्या तक्रारी वरून वसमत शहर पोलिस ठाण्यात शंकर हिरास याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना निलंगा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडल्यामुळे वसमत शहर पोलिसांनी सदर गुन्हा निलंगा पोलिसांकडे वर्ग केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article