माझे काम पोहचल्यावर मंत्रीपदाबाबत पक्ष निर्णय घेईल:आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला विश्वास

4 days ago 3
पर्वती मतदारसंघात १५ वर्ष चांगले काम करुनही आपण मंत्रीपदापासून दूर आहे याबाबत खंत वाटते का या प्रश्नावर आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, पर्वती मतदारसंघात मी १५ वर्ष चांगले काम केलेले आहे, असे मी बोलून चालणार नाही. मी चांगले काम केले आहे असे सगळ्यांना वाटले पाहिजे. या कामाचा मंत्रीपदाशी संबंध जोडला नाही पाहिजे कारण मंत्रीपदाबाबत पक्षच ठरवत असतो. तसेच मनुष्य स्वभाव असतो की, आमचे खुप काही चांगले काम केले आहे, तेव्हा आपल्याला मंत्रीपद मिळाले पाहिजे. तेवढ्यापर्यंत आपली राजकीय रणनिती पोहोच नसेल. परंतु कदाचित पुढच्या काळात ती पोहोचेल आणि मला मंत्रीपद मिळेल. निवडणुक आल्या की, अनेकजण तिकिट मिळवण्यासाठी इच्छुक असतात पण लोकशाहीत ते गैर नाही, अशी भावना मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पर्वती मतदारसंघात मागील १५ वर्षात केलेल्या विकासकामा बाबत माहिती देताना मिसाळ म्हणाल्या, पुणे शहरातील पर्वती मतदारसंघात मागील १५ वर्ष मी नियोजन काम केले असल्याने मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला आहे. मतदारांनी साथ दिल्याने पायाभूत सुविधाच्या निर्मितीसोबत विकसित मतदारसंघ म्हणून पर्वतीकडे पाहिले जाते. यावेळी देखील सदर मतदारसंघातून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असून पुढील पाच वर्षाचा विकास आराखडा देखील मी तयार केला. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका आदी प्रश्नांवर चांगल्याप्रकारे काम करता आले आहे. स्वारगेट, सिंहगड रस्ता येथील उ्डडाणपुलांमुळे सदर भागातील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. नदीपात्रातील रस्त्यास देखील मंजूरी मिळाली आहे. स्वारगेट यथील मल्टी मॉडेल हब मेट्रोच्या माध्यमातून तयार होत असून त्याद्वारे शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकत्रित जोडण्यात आल्या आहे. स्वारगेट ते कात्रज दरम्यान भूमिगत मेट्रो प्रकल्पास मंजूरी मिळून त्याचे भूमिपूजन झाले आहे. सिंहगड रस्त्यावरील नियोजीत मेट्रो मार्गाच्या दृष्टीने उड्डाणपुलासोबत मेट्रो खांब देखील उभारणी करण्यात आली आहे. पर्वती, तळजाई टेकडी याठिकाणी पर्यावरण वाचावे यादृष्टीने विकासकामे करत तळजाई टेकडीवर सुमारे २५० हेक्टर मध्ये सीमाभिंत बांधून ते क्षेत्र सुरक्षित करण्यात आले आहे. पर्वती येथे एैतिहासिक संग्रहालय निर्मिती करण्याचे काम ढप्रस्तावित आहे. बिबवेवाडी याठिकाणी ५०० बेडचे मोठे रुग्णालय उभारणी सुरु असून त्यापैकी १०० बेडचे रुग्णालय सुरु करण्यता आले आहे. माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असल्याने सुरक्षिततेच्या कारणामुळे अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहे. शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना, अनेक भागात पोलिस स्टेशन दूर असल्याने याच हेतूने स्मार्ट पोलिसींगसाठी कॅमेऱ्याचा वापर करण्यात येत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article