माढा विधानसभेसाठी इच्छुक असल्याने चर्चा:माढ्याचे सूरज देशमुख यांनी घेतली जयंत पाटील यांची भेट

4 days ago 3
माढा तालुक्यातील युवा नेतृत्व सूरज देशमुख यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब भेट घेतली. या भेटीमुळे परत माढा विधानसभा मतदारसंघातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीत आगामी माढा विधानसभा मतदारसंघात आताच्या राजकीय परिस्थितीवर ही चर्चा करण्यात आली. मागील दोन-तीन महिन्यापासून जयंत पाटील साहेब यांची देशमुख यांनी तिसऱ्यांदा भेट घेतल्यामुळे माढा विधानसभा मतदारस घासाठी तेही इच्छुक असल्याची चर्चे सध्या या मतदारसंघात होत आहे. नुकत्याच अकलूज येथे झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाना-भैय्या युवा मंचाच्या माध्यमातून त्यांनी काढलेल्या युवा सन्मान रॅलीचे ही कौतुक जयंत पाटील यांनी केले. टेंभुर्णी येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यास ही जयंत पाटील आवर्जून उपस्थित राहिले होते. त्यामुळे माढा तालुक्याच्या राजकारणात पाटील यांचे विश्वासू म्हणून सूरज देशमुख यांची ओळख निर्माण होत आहे. पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास कटिबद्ध आहे असेही देशमुख या भेटीदरम्यान पाटील यांना सांगितले आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर घेतलेली ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे. स्वच्छ प्रतिमा, युवकांत मिसळून काम करण्याची पध्दतीमुळे सूरज देशमुख हे नाव अल्पावधीत चर्चेत आले आहे. माढ्यात तुतारीकडून अजून एक चेहरा या निमित्ताने स्पर्धेत असू शकतो अशी माढा मतदारसंघात चर्चा आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article