मानवी साखळीतून मतदानाबाबत जनजागृती:‘वोटर मॅन’चा हरसूल बाजारपेठेत जनजागृती फेरीत उत्स्फूर्त सहभाग
2 hours ago
1
लोहोणेर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात २५० विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करत ‘मतदान करा’ नावाची प्रतिकृती रेखाटत मतदान जनजागृतीचा संदेश दिला. २० नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांमध्ये मतदानाविषयी जागृती व्हावी, आपल्या एका मताला लोकशाहीत किती किंमत आहे या हेतूने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने मुख्याध्यापक आर. एच. देसले यांच्या मार्गदर्शनाखाली व सांस्कृतिक समितीप्रमुख सुनील एखंडे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी ‘मतदान करा’ नावाच्या प्रतिकृतीचे रेखाटन करत २० नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत आपल्या हक्काचे मतदान करण्याचे आवाहन केले. उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शशिकांत ठाकरे, राकेश थोरात, दौलत पवार, अविनाश मोरे, रोहित पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उपक्रमात सहभाग घेतला. प्रतिनिधी | इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या हरसूल येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्या उपस्थितीत हरसूल येथील जिल्हा परिषद शाळा, हनुमान मंदिर चौक, ग्रामपंचायत कार्यालय, बिरसा मुंडा चौक ते दावलनगरमार्गे नाशिक-ठाणापाडा रस्त्यासह मुख्य बाजारपेठेत मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. या मतदार जनजागृती फेरीत सामान्य मतदार असलेल्या ‘वोटर मॅन’ या बाहुल्याने सहभाग घेतला. जनजागृती फेरीत अनेक मतदारांना आकर्षित केले. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून घोषणा देत मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी राज आहेर, ग्रामपंचायत कर्मचारी दीपक शेंडे, जनार्दन जाधव, पुंडलिक भोये यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या हातात लक्ष वेधून घेणारे फलक होते. प्रतिनिधी | सटाणा विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी मतदानाचे अधिकार ओळखून निष्पक्ष मतदान करावे यासाठी रोटरी क्लब, डॉक्टर्स असोसिएशन व वकील संघातर्फे रॅलीद्वारे जनजागृती केली. शुक्रवारी (दि. १५) शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून शिवतीर्थ ते तहसील कार्यालयापर्यंत मुख्य मार्गावरून जनजागृती रॅली काढत नागरिकांना मतदान अमूल्य असल्याचे सांगत जबाबदारीने मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी तहसीलदार कैलास चावडे यांची भेट घेतली. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंदे, डॉ. प्रकाश जगताप, सटाणा डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. दिग्विजय शाह, लॅब असोसिएशनचे डॉ. अमोल पवार, अॅड. यशवंत सोनवणे सहभागी झाले होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)