मालेगावला आमदार मुफ्ती इस्माईल‎समर्थक माजी नगरसेवकावर गोळीबार:दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांकडून गोळीबार, जिवंत काडतूस जप्त‎

2 hours ago 1
विधानसभेची मतदान व मतमाेजणी‎प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली आहे. निकालानंतर काही‎उपद्रवी हेतुपुरस्सर शहराचे वातावरण खराब‎करण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांकडे यासंदर्भात‎तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्रशासनाने याची गंभीर‎दखल घेतली असून कायदा हातात घ्याल तर याद‎राखा अशी तंबी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत‎भारती यांनी राजकीय पक्ष कार्यकर्ते व समर्थकांना‎दिली आहे. निवडणूक निकाल घाेषित झाल्यानंतर‎काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये‎वादावादीचे प्रकार घडत आहे. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात‎ घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समाेर‎आले आहे. पोलिसांनी हे फुटेज‎ताब्यात घेतले असून परिसरातील‎इतर भागातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे‎फुटेज तपासले जात आहे.‎हल्लेखाेरांची ओळख पटविण्याचे‎काम सुरु आहे. घटनेचा लवकरच‎उलगडा हाेईल असे सहायक‎अधीक्षक संधू यांनी सांगितले.‎ काही नेत्यांची कानउघाडणी‎ मध्य मतदारसंघात चुरशीच्या लढतीत अवघ्या १६२‎मतांनी विजयावर शिक्कामाेर्तब झाला आहे. निसटता‎‎पराभव जिव्हारी लागल्याने पराभूत‎‎उमेदवारांच्या समर्थकांमध्ये नाराजी‎‎आहे. तर दुसरीकडे अल्प मतांच्या‎‎विजयामुळे विजयी उमेदवारांचे‎‎समर्थक जाेमात आहेत. कायदा व‎‎सुव्यवस्थेचा प्रश्न उद‌्भवणार नाही‎याची काळजी घेऊन समर्थकांना आवर घाला, अशा‎शब्दात भारती यांनी नेत्यांची कानउघाडणी केली.‎ निकालानंतर वादावादीचे प्रकार‎ विधानसभा निवडणूक निकाल‎घाेषित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ‎‎मालेगावात गाेळीबाराची घटना ‎‎घडल्याने खळबळ उडाली आहे. ‎‎आमदार मुफ्ती इस्माईल यांचे‎समर्थक माजी नगरसेवक नदीमुद्दीन ‎‎अलीमुद्दीन ऊर्फ नदीम फीटर‎यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या‎दाेघा अज्ञातांनी गाेळीबार केला.‎नदीम हे घरात पळाल्याने थाेडक्यात ‎‎बचावले. हा प्रकार आझादनगर ‎‎भागातील बागे महेमूद परिसरात‎रविवारी रात्री पावणेबारा वाजता‎घडला. दरम्यान, पोलिसांनी‎घटनास्थळाहून एक जिवंत काडतूस‎व रिकामी पुंगळी जप्त केली आहे.‎ नदीम फीटर हे रात्री घराबाहेर ‎शेजारच्याशी गप्पा मारत उभे हाेते.‎थाेड्या वेळानंतर गेटचा दरवाजा‎उघडून ते दुचाकीजवळ येऊन‎थांबले. यावेळी दुचाकीवरून‎आलेल्या दाेघांपैकी पाठीमागे‎बसलेल्या व्यक्तीने अचानक‎त्यांच्यावर गाेळीबार केला. नदीम हे‎तत्काळ घरात पळाल्याने त्यांना‎गाेळी लागली नाही. गाेळीबार करून‎दाेघेही संशयित फरार झाले. घटनेची‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎माहिती मिळताच अपर पोलिस ‎‎अधीक्षक अनिकेत भारती, सहायक ‎‎पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू हे ‎‎घटनास्थळी दाखल झाले. घटनेमुळे ‎‎परिसरात तणाव निर्माण झाल्याने ‎‎पोलिसांनी बंदाेबस्तात वाढ केली. ‎‎पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी‎करत एक रिकामी पुंगळी व एक‎जिवंत काडतूस हस्तगत केले.‎गाेळीबार का व कुणी केला याचा ‎‎पोलिस तपास करत आहे. यामागे ‎‎राजकीय तसेच आर्थिक‎देवाण-घेवाण, बनाव यासह इतर‎शक्यतांची पोलिसांकडून पडताळणी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎केली जात आहे. याप्रकरणी‎आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा‎दाखल झाला आहे.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article