माहिती अधिकार सप्ताहानिमित्त गो. से. महाविद्यालयात विविध स्पर्धा:सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रतीक तायडे प्रथम, क्रिपा धांडे द्वितीय, यशकुमार फुलकर तृतीय

2 hours ago 1
विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ गो. से. विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभागाद्वारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धनंजय तळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती अधिकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाचा समारोप १४ ऑक्टोबर रोजी करण्यात आला. अध्यक्षस्थानी म्हणून संस्कृत विषयाच्या प्रा. संगीता वायचाळ तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून वनस्पतीशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक पडघान हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. बी. एम. टकले यांनी केले त्यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माहिती अधिकार सप्ताहामध्ये आयोजित केलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिसे वितरित करण्यात आले. सामान्य ज्ञान स्पर्धा प्रतीक राजेश तायडे प्रथम, क्रिपा दिलीप धांडे द्वितीय, यशकुमार फुलकर तृतीय, निबंध स्पर्धेसाठी राजकीय व्यवस्था व माहिती अधिकार या विषयावर ४३ विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामधून अनुक्रमे भक्ती संतोष तायडे प्रथम, श्रेया अशोक तेल्हारकर द्वितीय, शेजल गोपाल वानखेडे तृतीय यांना पारितोषिके मिळाली. पोस्टर व भित्तिपत्रक स्पर्धेत वेदश्री कुलकर्णी, मयुरी चीम (सामूहिक) प्रथम, साक्षी अहेरकर द्वितीय, दिशा पायघन तृतीय बक्षीस मिळाली. वक्तृत्व स्पर्धात भ्रष्टाचार नियंत्रणामध्ये माझी भूमिका या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रगट केले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. अढाऊ व मराठी विभागाचे प्रा. विक्रम मोरे यांनी परीक्षण केले. प्रेरणा सुनील देशमुख प्रथम, गायत्री एकडे द्वितीय, यशकुमार फुलकर तृतीय यांना बक्षिसे मिळाली. समारोपीय कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा.डी. एस. भुतेकर, प्रा. उमेश खंदारे उपस्थित होते. सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागातील प्रा. वृषाली घोराळे तर आभार प्रदर्शन प्रा. धम्मपाल गवई यांनी मानले. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे. सुटाळा येथील नागरिकांमध्ये विद्यार्थ्यांनी केली जागृती या सप्ताहामध्ये स्पर्धेबरोबर माहिती अधिकार जनजागृती मतदान जनजागृती सुटाळा (बु )या गावी जाऊन महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. बी . एम. टकले व विद्यार्थ्यांनी केली ज्यामध्ये दिशा पायघन, रोहित भोजने, अचल रघुवंशी, सुमित गावंडे, प्रथमेश देविकार, मंजू चंदनसे, विशाल बोचरे या विद्यार्थ्यांचा समावेश होता माहिती अधिकार संदर्भातील माहिती व आपल्या भारत देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान जनजागृती या सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांकडून करण्यात आली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article