मी राहुल गांधींची लाडकी बहीण, मोदींना उत्तर देते बाळासाहेब आमचेही:मोदींनी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या पुढे नेण्याची जाहीर करावे- प्रियंका
5 days ago
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वीर सावरकर व बाळासाहेब ठाकरे यांचे जाहीरपणे नाव घेऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. ते काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शनिवारी पूर्ण केले. शिर्डी व कोल्हापुरातील प्रचार सभेत प्रियंका म्हणाल्या, ‘मी राहुल गांधी यांची बहीण म्हणून मोदींना सांगते की, बाळासाहेब ठाकरे व आमची विचारधारा वेगळी होती, पण आम्हाला त्यांचा सन्मान आहे. काँग्रेस व बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान केला, त्यांचा अपमान कधीही सहन केला नाही,’ असे प्रियंका म्हणाल्या. आता मोदींना माझे आव्हान आहे की, त्यांनी जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या पुढे नेण्याची जाहीरपणे घोषणा करून दाखवावी, असे प्रियंका म्हणाल्या. मोदी पाठीत खंजीर खुपसतात ‘महाराष्ट्र ही महापुरुषांची पवित्र भूमी आहे. या भूमीतून मानवता आणि समतेचा संदेश देण्यात आला. मात्र या भूमीचा अपमान होत आहे, शिवरायांचासुद्धा अपमान होत आहे. पंतपधान मोदींचे भाषण ऐकले की दुःख होते. सत्य आणि सकारात्मक भाषण ऐकायला मिळत नाही. ते एकीकडे व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात आणि दुसरीकडे त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला जातोय,’ अशी टीकाही त्यांनी केली.
राहुल गांधींचे भाषण विदर्भात, मुद्दे मात्र अमेरिका-रशियाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विधासभा निवडणूक प्रचाराचे भाषण अमरावतीत केले, पण त्यात मुद्दे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन, रशियाचे पुतीन, युक्रेन या देशांचा उल्लेख केल्याने उपस्थित लोकाही चक्रावून केले. पंतप्रधान मोदींची मेमरी लॉस झाल्याचा आरोप करून राहुल म्हणाले, ‘आम्ही संविधान रक्षणाच्या गोष्टी करतो, तर ते म्हणतात राहुल आरक्षणविरोधी आहेत. आता तेही संविधान रक्षणाचे बोलतात, त्यांना विस्मरणाचा आजार झालाय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनाही विस्मरणाचा आजार झाला होता. ते कधीही काहीही बोलायचे. एकदा त्यांच्या देशात युक्रेनचे राष्ट्रपती गेले होते तर ते म्हणाले, रशियाचे राष्ट्रपती पुतीन आले. मग त्यांना कुणीतरी चुकीची दुरुस्ती करून दिली. तशीच स्थिती मोदी यांची झाली आहे. महाराष्ट्रात ठाकरेंचे सरकार जमिनी बळकावण्यासाठी पाडले. हे सरकार चोरीचे आहे. ५०-५० कोटी देऊन आमदार खरेदी केले. गरीब लोकांची जमीन अदानींना देण्यासाठी मोदी-शाह यांनी सरकारची चोरी केली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. लाडक्या बहिणीचा समाचार लाडकी बहीण योजनेपोटी १५०० रुपये देता; पण याच बहिणींकडून ओरबाडता किती याचा काहीतरी हिशेब पाहिजे. मतदानाच्या ४ महिने आधी पैसे दिले तर मते मिळतील हा तुमचा भ्रम आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा मोदींनी उद्योगपतींचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांकडून जीएसटी वसुली केली जात आहे. सोयाबीन, कापसाला दर मिळत नाही. निर्यात बंद करून कांदा उत्पादकांना अडचणीत आणले. उद्योग, रोजगार पळवले मोदींनी महाराष्ट्रातील उद्योग पळवलेत. १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक इतर राज्यांत पाठवली. ८ लाख रोजगारही गेले. मोदीजी निवडणूक सोडून विदेशात गेले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)