मुंबईत CSMT परिसरात महिलेवर सामुहिक बलात्कार:टॅक्सी स्टँडच्या मागे दोघांनी तोंड दाबून आळीपाळीने केला अत्याचार

2 hours ago 1
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. आधी बदलापूर त्यानंतर पुणे आणि आता मुंबईत देखील एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर एका 29 वर्षीय महिलेवर दोन नराधमांनी अत्याचार केला. ही घटना 22 सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी आरोपींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला 22 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात एकटीच उभी होती. त्याचवेळी दोन अज्ञात व्यक्ती तिच्याजवळ आले. काही कळण्याच्या आत त्यातील एका व्यक्तीने तिचे तोंड दाबले. महिलेने आरडाओरड करु नये यासाठी आरोपींनी तसे केले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी पीडित महिलाला रेल्वे स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टँडच्या मागे घेऊन गेले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी महिलेला धमकावले आणि तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. असे पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपींवर गुन्हा दाखल या घटनेनंतर महिलेने रेल्वे पोलिसांत धाव घेतली. छत्रपती शिवाजी महाराज लोहमार्ग पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला. आता पुढील तपासासाठी हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सीएसएमटी रेल्वेस्टेशन सारख्या वर्दळ असलेल्या परिसरात महिलेवर अत्याचार झाल्यामुळे सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. बोपदेव घरात परिसरात तरुणीवर सामुहिक बलात्कार दरम्यान, याआधी पुण्यात कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात 21 वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली होती. 21 वर्षीय तरुणी आपल्या मित्रांसोबत रात्रीच्या सुमारास बोपदेव घाट परिसरात गेली होती. तेथे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिघांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास माहिती मिळाली. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. तर वानवडी भागात एका स्कूलव्हॅनमध्ये चालकाकडून दोन अल्पवयीन चिमुकलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हेही वाचा... पुण्यात 6 वर्षीय 2 मुलींचे लैंगिक शोषण:वंचितच्या कार्यकर्त्यांनी फोडली स्कूलबस; फडणवीसांचे कठोर कारवाई करण्याचे निर्देश बदलापूर येथील शाळेत शिपायाकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना ताजी असतानाचा आता पुण्यात देखील अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली आहे. ताज्या घटनेत वानवडी येथील एका नराधमाने 6 वर्षांच्या दोन मुलींचा स्कुल व्हॅनमध्ये लैंगिक छळ केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सदर स्कूल व्हॅनची तोडफोड करण्यात आली. याच व्हॅनमध्ये चिमुकलींवर अत्याचार झाल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article